मुंबई : कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona Second Wave) दिवसेंदिवस अतिशय घातक ठरत आहे. तसेच ही दुसरी लाट अतिशय विध्वसंक ठरत आहे. बुधवारी (5 मे) कोरोना विषाणूच्या आकडेवारीचे सर्व जुने विक्रम मोडले गेले आहेत. बुधवारी भारतात 4,12,262 नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आणि 3980 लोक एकाच दिवशी मरण पावले आहेत. देशात दररोज लाखो नवीन रुग्ण वाढत आहेत. यामुळे आरोग्य सुविधांना देखील प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. देशातील बर्याच मोठ्या शहरांमध्ये ऑक्सिजनची तीव्र कमतरता भासत आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे बर्याच कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. यावरून देशभरातील कोरोना स्थितीच्या भीषणतेचा अंदाज बांधला जाऊ शकतो (Health Tips to boost Oxygen level during corona Pandemic).
अशावेळी या विषाणू पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आणि याची लागण आपल्याला होऊन नये म्हणून सगळेच लोक खबरदारीचा उपाय अर्थात ‘इम्युनिटी’ वाढवण्यासाठी आहारात आवश्यक ते बदल करत आहेत. मात्र, शरीरातील ऑक्सिजन पातळी संतुलित राखण्यासाठी देखील आहारात आपण काही विशिष्ट घटक सामील करू शकता.
कोरोना विषाणू आपल्या फुफ्फुसांवर हल्ला करणारे आहेत, ज्यामुळे श्वास घेण्यात त्रास होतो आणि वेळेवर ऑक्सिजन उपलब्ध नसल्यामुळे मरण पावणारे रुग्ण यांची संख्या वाढत आहे. कोरोना टाळण्यासाठी ऑक्सिजनची पातळी नियमितपणे राखणे फार महत्वाचे आहे. शरीरात ऑक्सिजनची पातळी संतुलित राखण्यासाठी आपण आपल्या अन्नावरही विशेष लक्ष दिले पाहिजे. चला तर, जाणून घेऊया अशाच काही पदार्थांबद्दल, जे आपल्या आहारात समाविष्ट करून आपण ऑक्सिजनची पातळी संतुलित राखू शकता. हे पदार्थ आपल्या शरीराची ऑक्सिजन पातळी योग्य राखण्यासाठी खूप उपयुक्त आहेत (Health Tips to boost Oxygen level during corona Pandemic.
1) शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियमित राखण्यासाठी पाण्याची सर्वात महत्वाची भूमिका असते. म्हणून दिवसभर जास्तीत जास्त पिण्याचा प्रयत्न करा.
2) सोयाबीन आणि अक्रोड आपल्या शरीरात केवळ ऑक्सिजनची पातळी वाढवतच नाही, तर ती टिकवून ठेवण्यासाठीही उपयुक्त ठरतात.
3) कोरोनाचे हे संकट पाहता, शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण नियमित राखणे फार महत्वाचे आहे. बाजारात सहजपणे उपलब्ध असणाऱ्या ब्रोकोली आणि कॅप्सिकममुळे ऑक्सिजनची पातळी वाढते. आपल्या आहारात या भाज्यांचे जास्तीत जास्त सेवन करण्याचा प्रयत्न करा.
4) ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी, आपल्या आहारात गाजर आणि सोयाबीनचा देखील समावेश करा. हे घटक आपल्या शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ देत नाहीत.
5) शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी ही फळे नियमित सेवन करा. ही फळे अनेक गुणांनी परिपूर्ण आहेत, जी या संकट काळात आपल्याला सुरक्षित ठेवू शकतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Health Tips to boost Oxygen level during corona Pandemic)
Beauty Tips : तजेलदार आणि कोमल त्वचेसाठी बदामाचे तेल फायदेशीर !
Health tips : कोरोना रुग्णांनो ‘या’ गोष्टी आहारातून टाळा, अन्यथा रोगप्रतिकारक शक्तीवर होईल परिणाम
Coriander Water Benefits : रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या ‘धण्याचं पाणी’https://t.co/Hs2UbtpENk #Corianderwater |#ImmunityBoosterTips | #immunesystem | #HealthTips | #healthcare | #Food | #lifestyle
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 5, 2021