Constipation Problem | बद्धकोष्ठतेच्या समस्येला तुमच्यापासून दूर ठेवतील ‘हे’ रस, नियमित करा सेवन!

| Updated on: Feb 27, 2021 | 10:24 AM

आजच्या काळात लोक काहीही अरबट-चरबट खातात. कामांची गडबड, घाईघाई या सगळ्यामध्ये त्यांच्या शरीरासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, याचा विचार देखील लोक करत नाहीत

Constipation Problem | बद्धकोष्ठतेच्या समस्येला तुमच्यापासून दूर ठेवतील ‘हे’ रस, नियमित करा सेवन!
बद्धकोष्ठता
Follow us on

मुंबई : आजच्या काळात लोक काहीही अरबट-चरबट खातात. कामांची गडबड, घाईघाई या सगळ्यामध्ये त्यांच्या शरीरासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे, याचा विचार देखील लोक करत नाहीत. परंतु, आपणास हे माहित असणे आवश्यक आहे की, आपले खाणे-पिणे, चांगल्या आरोग्यासह थेट आपल्या पाचन तंत्राशी देखील जोडलेले असते. जर, आपल्या पाचन तंत्रामध्ये अडथळा येत असेल, तर आपला संपूर्ण दिवस देखील वाया जातो. बर्‍याचदा आपण असा अनुभव घेतला असेल की, आपल्या पोटात जडपणा आहे आणि अशावेळी आपल्याला काही खाण्याची इच्छा होत नाही (Healthy and beneficial juice for Constipation Problem).

आपल्याला एक विचित्र अस्वस्थता भासू लागते. वास्तविक, ही सर्व बद्धकोष्ठतची चिन्हे आहेत. आठवड्यातून दोन ते तीन वेळा मलविसर्जन आणि आतड्यांसंबंधी हालचाली दरम्यान वेदना आणि रक्त पडणे, ही बद्धकोष्ठतेची मुख्य लक्षणे आहेत, ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू नये.

बद्धकोष्ठतेच्या समस्येसंदर्भात डॉक्टर नेहमीच तुम्हाला भरपूर पाणी पिण्याचा आणि फायबर समृद्ध अन्न घेण्याचा सल्ला देतात. यामुळे बऱ्याचदा बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत होते. तथापि, बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी आपण काही हेल्दी रस देखील पिऊ शकता. अशावेळी पॅक केलेला रस पिण्याऐवजी, ताज्या फळांचा रस प्या. चला तर, या रोगासाठी कोणता रस सर्वोत्कृष्ट असेल ते आपण जाणून घेऊया…

सफरचंद रस

सफरचंदमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म भरपूर असतात. आपण रस आणि फुले दोन्ही घटक वापरू शकता. त्याच्या वापरामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. शरीरातील पाण्याची कमतरता दूर करण्याबरोबरच ते आपल्या चेहऱ्यावर चमक देखील आणते (Healthy and beneficial juice for Constipation Problem).

नाशपती रस

नाशपती फायबरमध्ये समृद्ध असतात, ज्याद्वारे आपल्या बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि यामुळे तुमची पाचक प्रणाली देखील बरीच मजबूत राहते. यात आढळणारा पॅक्टिन नावाचा घटक बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. नाशपतीच्या रसात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास बद्धकोष्ठता तर दूर होतेच आणि आपले पोटही स्वच्छ राहते. याशिवाय, हा रस शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतो, ज्यामुळे अनेक प्रकारच्या संक्रमणाची शक्यता कमी होते.

संत्र्याचा रस

संत्रामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात आढळतो. याव्यतिरिक्त, त्यात फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स सारखे घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे आपल्या शरीरातील पाण्याची कमतरताच दूर करतातच, परंतु आपल्या पाचक तत्वाला देखील मजबूत बनवतात आणि आपल्या चेहऱ्याला छान चमकदार बनवतात.

(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Healthy and beneficial juice for Constipation Problem)

हेही वाचा :

Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…

Migraine | मायग्रेनमुळेही होऊ शकते मान दुखीची समस्या, ‘या’ लक्षणांना करू नका नजर अंदाज!