मुंबई : अलिकडील काळात मानवी जीवन हे अत्यंत धकाधकीचे आणि प्रचंड अस्थिर बनले आहे. त्यामुळे त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो. सहाजिकच योग्य काळजी न घेतल्याने मानवी शरीराला विविध आजारांना तोंड द्यावे लागते. या आजारांमध्ये मधुमेहाचा क्रमांक सर्वात आधी लागतो (Healthy juice for Type 2 diabetes).
मधुमेह हा असा आजार आहे, ज्याने अनेक लोक त्रस्त आहेत. आहार आणि जीवनशैलीतील बदलांकडे लक्ष न दिल्याने मधुमेह होतो. रक्तातील साखर नियंत्रित करून आपण हा आजार बरा करू शकता. मधुमेह ग्रस्त लोक कुठल्याही प्रकारचा ज्यूस पिताना कचरतात, कारण त्या रसात साखर अधिक प्रमाणात असते. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशाच काही ज्यूसविषयी सांगणार आहोत, ज्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित होते. याशिवाय इतर समस्यांमधूनही आराम मिळू शकतो.
जास्तीत जास्त पाणी प्यावसे वाटणे. वारंवार लघवीला लागणे. जास्त पाणी पिऊनही वारंवार तहान लागणे. अशा वेळी तहान भागवण्यासाठी काही लोक ज्यूस, सोडा, चॉकलेट, दूध आदी गोष्टींचे सेवन करतात. पण, या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील साखर अधिकच वाढते. त्यामुळे होणारा त्रास कमी होण्याऐवजी अधिक वाढतो.
वजन अधिक मोठ्या प्रमाणात वाढणे मधुमेहाला निमंत्रण देते. तसेच, प्रमाणापेक्षा कमी होणे हे सुध्दा मधुमेहाचेच लक्षण आहे. काम केल्यावर थकवा जाणवतो, ही अत्यंत साधी बाब आहे. मात्र, नियमितपणे अशक्तपणा जाणवणे हे मधुमेहाचे लक्षण आहे.
– टाईप 1चा मधुमेह हा स्वयंप्रतिकार रोग आहे. ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे शरीर इन्सुलिन तयार करण्यास अक्षम असते. केवळ 1 टक्के लोक टाईप 1 मधुमेहाने ग्रस्त आहे. याची लक्षणे बहुधा बालपणी किंवा पौगंडावस्थेमध्ये दिसू लागतात.
– त्याच वेळी, टाईप 2 मधुमेहामध्ये शरीरात इन्सुलिन तयार होते. परंतु, ते योग्यप्रकारे प्रक्रिया करण्यास सक्षम नसते. सुरुवातीला बहुतेक लोकांना त्याची लक्षणे समजत नाहीत. कधीकधी, तणाव आणि थकवा म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, वेळीच चाचणी करून घेणे आवश्यक आहे (Healthy juice for Type 2 diabetes).
मधुमेहग्रस्त रुग्णांनी हिरवे सफरचंद, लिंबू, कोबी, लसूण, टोमॅटो, कारले इत्यादी पदार्थांचे अधिकाधिक सेवन करावे. यापैकी कोणत्याही 3-4 भाज्या घेऊन, त्यात पाणी घाला आणि त्याचा ज्यूस बनवा.
– या सर्व रसात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असते जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. दररोज हा रस सेवन केल्याने तुम्ही अनेक प्रकारचे आजार टाळू शकता.
– हे रस व्हिटामिन ए, सी आणि लोहाने समृद्ध असतात.
– यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित होते आणि हृदयाशी संबंधित आजार कमी होतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
(Healthy juice for Type 2 diabetes)
beauty tips | फक्त ‘या’ 6 गोष्टी करा आणि मिळवा तजेलदार चेहराhttps://t.co/6Sm47ZBB8x#beauty #beautytips #tips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 7, 2020