मूड खराब होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. एकदा एखाद्या व्यक्तीचा मूड खराब झाला की त्या क्षणी चिडचिडेपणा येऊ शकतो. अशावेळी खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, विशेषत: त्या गोष्टींकडे जे शरीर मजबूत ठेवतात आणि तंदुरुस्ती सुधारतात. यासोबतच काही खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुमचा मूडही सुधारू शकतो. होय, बऱ्याचदा खाद्यपदार्थांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर संयुगे असतात, ज्यामुळे आपला मूड चांगला राहण्यास मदत होते. अशावेळी येथे जाणून घ्या हेल्दी फूडबद्दल जे मूड सुधारण्यासाठी मदत करतात.
– नटसमध्ये ट्रिप्टोफेन, एक अमिनो ॲसिड असते जे सेरोटोनिन वाढविण्यास मदत करते. हे हार्मोन्स मूड नियंत्रित करण्यास मदत करतात. नटसमध्ये प्रथिने, निरोगी फॅट,व्हिटॅमिन ई चा चांगला स्रोत देखील आहेत.
– लहानांपासून मोठ्यांपर्यंत चॉकलेट सर्वांनाच आवडते. फ्लेव्होनॉइड्सने समृद्ध असलेले डार्क चॉकलेट सेरोटोनिनची पातळी वाढवू शकते. ज्यामुळे नैराश्याची लक्षणे कमी होण्यास मदत होते. सकाळच्या ओट्समध्ये चॉकलेटचे काही तुकडे घाला किंवा कॉफीमध्ये मिक्स करून सेवन करू शकतात.
– केळीच्या सेवनाने खराब मूड चांगला होण्यास मदत होते. यात व्हिटॅमिन बी 6 समृद्ध आहेत, जे डोपामाइन आणि सेरोटोनिन सारख्या फील-गुड न्यूरोट्रांसमीटरच्या उत्पादनास मदत करते. फायबरसह एकत्र केल्यास, साखर हळूहळू रक्त परिसंचरणात सोडली जाते, रक्तातील साखरेची पातळी स्थिर करते आणि मूड सुधारते. कमी रक्तातील साखरेची पातळी चिडचिडेपणा आणि मूड बदलण्यास कारणीभूत ठरू शकते.
– ओट्स नाश्त्यात खाण्यासाठी चांगला पर्याय आहे. ओट्स हळूहळू ऊर्जा वाढवतात. हे साखरेची वाढ आणि घसरण रोखू शकते ज्यामुळे आपल्या मूडवर चांगला परिणाम होऊ शकतो.
– पालकाच्या पानांमध्ये फोलेट, व्हिटॅमिन बी समृद्ध असे घटक असतात. जे मूड-नियमन करणारे न्यूरोट्रान्समीटर, सेरोटोनिन आणि डोपामाइन वाढविण्यास मदत करते.
– प्रोबायोटिक्स नैराश्यावर उपचार करण्यास मदत करू शकतात. इडली, डोसा आणि डेअरी-मुक्त दही यासारखे आंबवलेले पदार्थ प्रोबायोटिक्सने भरलेले असतात. हे पदार्थ घरी बनविणे सोपे आहे.