हिवाळ्यात थंड वातावरणामुळे अनेकांची त्वचा खूप कोरडी पडते, ज्यामुळे चेहरा अतिशय निस्तेज होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही सोशल मीडियावर जाऊन अनेक उपाय शोधत राहतात. याशिवाय ब्युटी प्रॉडक्ट्ससोबतच अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे फेशियलही करत राहतात, पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची त्वचा आतून निरोगी असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळेच तुमच्या त्वचेची नैसर्गिक चमक वाढेल. यासाठी तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये काही हेल्दी ड्रिंक्सचा समावेश करू शकता, जे पौष्टिकतेने समृद्ध आहेत. हे ड्रिंक्स प्यायल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक तर येईलच, आणि आरोग्याला ही फायदा होईल.
आपल्याला त्वचा, केस आणि नखे यांच्या आरोग्याशी संबंधित बहुतेक समस्या या योग्य आहाराच्या अभावामुळे उद्भवतात. सध्या हिवाळ्यात तुमची त्वचा निरोगी ठेवायची असेल तर केवळ स्किनकेअरच गरजेचं नाही, तर यासोबतच काही ड्रिंक्सला डाएटचा भाग बनवायला हवं. चला तर मग जाणून घेऊया या ड्रिंक्सबद्दल.
हिवाळ्यात तहान कमी लागत असल्याने अनेकजण पाणी पिणे कमी करतात, पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास त्वचेसह आरोग्यासाठी हानिकारक आहे. उन्हाळ्यात बरेच लोकं नारळाचे पाणी पितात, पण हिवाळ्यात नारळाचे पाणी पिणे टाळतात,कारण याने सर्दी, खोकला होऊ शकतो. पण नारळाच्या पाण्याचा तुमच्या रुटीनमध्ये समावेश करा. यामुळे त्वचा निरोगी राहील आणि शरीरात ऊर्जाही राहील.
हिवाळ्यात अनेक लोकं आहारात लिंबू खाण्याचे टाळतात, पण तुम्ही जर हिवाळ्यात लिंबाचे सेवन केल्यास तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते. कारण यात व्हिटॅमिन सीचा उत्कृष्ट स्त्रोत आहे, म्हणून ते त्वचेसाठी फायदेशीर आहे. निरोगी त्वचेसाठी तुम्ही लेमन टी पिऊ शकता. पाणी गरम करावे. कोमट झाल्यावर त्यात लिंबू आणि मध घालून प्यावे. हे त्वचेला हायड्रेट करेल, व्हिटॅमिन सी च्या घटकामुळे तुम्ही त्वचा चमकदार होईल तसेच मध त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. वजन नियंत्रित राखण्यासाठीही हे पेय उपयुक्त ठरेल.
हिवाळ्यात हळदीचे दूध हे एक उत्तम पेय आहे. ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार तर होईलच, शिवाय हाडेही मजबूत होतील. त्यात हिवाळ्यात आजारीही पडणार नाही. तसेच तुम्हाला जर झोपेची समस्या असेल तर त्यात देखील सुधारणा होईल. तसेच श्वसनाच्या समस्येवरही हळदीचे दूध फायदेशीर आहे.
आपल्या सर्वांनाच माहित आहे की कोरफडीचा वापर हा त्वचेवर लावण्यासाठी केला जातो. याशिवाय त्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीरासोबत त्वचेला आश्चर्यकारक फायदे मिळतात. हिवाळा असो वा उन्हाळा, कोरफडीच्या रसाचा तुमच्या आहारात समावेश करा. यामुळे त्वचेवर चमक तर येईलच, शिवाय चेहऱ्यावरील डागही कमी होतील आणि निस्तेजपणा दूर होईल. मात्र, कोणत्याही प्रकारची आरोग्यसमस्या असल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तुम्ही तुमच्या डाएटमधून सामान्य चहा काढून ग्रीन टीचा समावेश करा. कारण ग्रीन तिच्या सेवनाने बरेच फायदे प्रदान करते. कारण ग्रीन टीमध्ये साखर नसते आणि बऱ्याच अँटीऑक्सिडंट्ससमृद्ध स्रोत असतात. ग्रीन टीमुळे त्वचेची चमक वाढते तसेच वजन कमी होण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)