हायजिन म्हणून कागदी कपमध्ये चहा किंवा कॉफी पिता का? हे जाणून पुन्हा कधीच वापरणार नाहीत हे कप

| Updated on: Feb 05, 2025 | 4:32 PM

आजकाल पेपर कपचा वापर वाढला आहे, पण या पेपरकपमुळे आपलं आरोग्य किती धोक्यात येऊ शकतं याची कल्पनाही कदाचित आपल्यापैकी कित्येकांना नसेल. त्यामुळे हायजिन म्हणून वापरत असलेले हे पेपर कप आपल्या आरोग्यावर किती दुष्परिणाम करतात हे जाणून आजपासूनच याचा वापर बंद कराल.

हायजिन म्हणून कागदी कपमध्ये चहा किंवा कॉफी पिता का? हे जाणून पुन्हा कधीच वापरणार नाहीत हे कप
Follow us on

आजकाल सर्वत्र म्हणजे चहाच्या टपरीवर किंवा अगदी ऑफिसमध्येही युज अँड थ्रोवाले पेपर कप पाहायला मिळतात. आणि आपण त्यांचा वापर हायजिन म्हणून करतो.करोनानंतर तर या कपचा वापर जरा जास्तच वाढलेला दिसतो. तसंही पेपर कपचा वापर चहा, कॉफी किंवा इतर पेये घेण्यासाठी खूप सोयीस्कर पडतो. हायजिन म्हणून वापरत असलेल्या या पेपर कपमुळे तुमच्या आरोग्याचं किती नुकसान होऊ शकत याची कल्पना आहे का तुम्हाला? कागदाच्या कपमध्ये चहा किंवा कॉफी पिणे तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक असू शकते हे कदाचित आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नाही.

कागदी कपच्या वापरामुळे नक्की काय धोका असू शकतो हे जाणून घेऊयात.

पेपर कपमध्ये लपलेला धोका नक्की काय?

पेपर कप बनवण्यासाठी अनेक रसायने वापरली जातात, जसे की फॉर्मल्डिहाइड, डायऑक्सिन्स आणि पॉलीक्लोरिनेटेड बायफेनिल्स (पीसीबी). ही रसायने गरम पेयांच्या संपर्कात आल्यावर पाण्यात विरघळू शकतात आणि त्यामुळे पोटातही गेल्यानं नक्कीच त्रास होऊ शकतो.

काही पेपर कपमध्ये एक्सट्रुडेड पॉलिस्टीरिन (EPS) चे आवरण असतं, जे एक प्रकारचे प्लास्टिक आहे. गरम पेयांच्या संपर्कात आल्यावर EPS हानिकारक रसायने सोडू शकते, जी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात.

पेपर कपमध्ये वापरले जाणारे काही रसायने पोटात गेल्यास हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम करू शकतात, ज्यामुळे प्रजनन क्षमता, थायरॉईड ग्रंथींबाबत आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

कर्करोगाचा धोका, काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की पेपर कपमध्ये वापरल्या जाणाऱ्या काही रसायनांमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

यावर उपाय काय?

स्टील, काच किंवा मातीची भांडी वापरणे त्यापेक्षा तरी उत्तम. शक्य तिथे मातीच्या भांड्यांमध्ये चहा किंवा कॉफी प्या. ही भांडी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक असतात.

पेपर कपचा वापर कमी करा. जर तुम्हाला पेपर कप वापरायचे असतील तर गरम पेयांसाठी डिझाइन केलेले कप वापरा.

पेपर कप जास्त वेळ गरम पेयांच्या संपर्कात ठेवू नका: जर तुम्ही पेपर कपमध्ये चहा किंवा कॉफी पीत असाल तर ते लवकर प्या आणि कप जास्त वेळ गरम पेयांच्या संपर्कात ठेवू नका.

कागदी कपचा वापर कमी करून तुम्ही पर्यावरणही वाचवू शकता

अशापद्धतीने तुम्हा काही गोष्टींची काळजी घेत पेपर कप वापरण्यावर रोख लावू शकता.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)