मुंबई : होळी (Holi 2021) हा सण अगदी जवळ आला आहे आणि आपल्यातील बहुतेक लोक असा विचार करत आहेत की, आपण सध्या चालू असलेल्या कोरोनाच्या साथीतीत हा सण कसा साजरा कसा साजरा करणार आहोत? या विचारत आपण सगळेच गर्क झाले आहोत. यंदाच्या वर्षी आपण नेहमीप्रमाणे आणि सर्वसाधारणपणे उत्सव साजरे करू शकणार नाही. होळी म्हणजे दरवर्षी पाण्याची बरसात आणि रंगाची उधळण असते. मात्र, यंदा या सगळ्याच गोष्टींवर रोख लावण्यात आला आहे (Holi 2021 know how to play safe holi at home).
गेल्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे होळी साजरी करता आली नव्हती. यावर्षीसुद्धा कोरोनामुळे काहीशी अशीच स्थिती आहे. पण, तरीही काळजी करण्याची काही गरज नाही. कोरोना तर काय झालं? याचा अर्थ असा नाही की, आपण उत्सवाचा आनंद घेणार नाही किंवा उत्सव साजरा करणार नाही. आपण आपल्या घरीच संपूर्ण काळजी घेऊन हा सण साजरा करू शकता.
होळीच्या सणानिमित्त, यंदा आपण आपल्या घरातील सदस्यांसमवेत घरच्या घरीच होळी साजरी करू शकता. घरीच काही छोटेखाणी कार्यक्रम आयोजित करून आपण आपल्या कुटुंबाला या सणाचा आनंद देऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी सुरक्षित होळीचा आनंद घेण्यासाठी कोणत्या पद्धती वापरता येतील…
होळीच्या निमित्ताने आनंद साजरा करण्यासाठी आपल्या घरात अनेक पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांमध्ये गुजिया, चिल्लई, पकोडे इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. म्हणूनच होळीचा खास आनंद साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबातील सदस्यांसह घरच्या घरी खास पदार्थ बनवू शकता. तसेच, खास जेवणाचे आयोजन करू शकता आणि घरीच सुरक्षितपणे हा उत्सव साजरा करू शकता (Holi 2021 know how to play safe holi at home).
जर आपण बाहेर जाऊन होळी खेळू शकत नसाल, तर आपल्या घरातील सदस्यांसह आपल्या बाल्कनीमध्ये सुक्या रंगाने होळी खेळू शकता.
होळीच्या सणाची धमाल गाणी इंटरनेटवर आढळतात. ‘रंग बरसे’ ते ‘अंग से अंग लगाना’पर्यंतच्या सगळ्या गाण्यांची आपण होळी प्लेलिस्ट तयार करू शकता आणि होळीच्या या खास गाण्यांवर आपल्या परिवारासह धमाल डान्स करू शकता.
आपल्या होळीच्या उत्सवाला आणखी खास करण्यासाठी रंगीबेरंगी पिचकाऱ्या आणि मजेदार प्रॉप्स खरेदी करा. लहान मुलांबरोबर लहान व्हा आणि ही होळी मजेशीर मार्गाने घरीच साजरी करा.
(Holi 2021 know how to play safe holi at home)
Osteoporosis Diet : मजबूत हाडांसाठी उन्हाळ्यात खा ही फळे, जाणून घ्या यांचे आरोग्यदायी फायदे
Video | पोटावरची चरबी कमी करायचीय? मग, शिल्पा शेट्टीने सांगितलेली ‘ही’ योगासने नक्की ट्राय करा!#BellyFat | #WeightLoss | @TheShilpaShetty | #yoga | #fitness https://t.co/jvkuwZDq5t
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021