मुंबई : होळीच्या निमित्ताने रंग आनंद पसरवण्याचे काम करतात. परंतु, जर या रंगांमध्ये भेसळ असेल तर सर्व आनंद बेरंगी होतो आणि त्याला जास्त वेळ लागत नाही. रंगपंचमीसाठी आपण ज्या रंगांचा वापर करतो त्या रंगांमध्ये क्रोमियम, सिलिका, शिसे, सल्फेट आणि अल्कलाईन सारखी रसायने देखील टाकली जातात. या कृत्रिम रंगांमध्ये काचेची पावडरची भेसळ केल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत (Holi 2021 know the harmful side effects of chemical colors).
आपण आपल्या त्वचेचे रक्षण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी चांदीच्या रंगाचा वापर करतो, त्या चांदीच्या रंगात कार्सिनोजेनिक असते, यामुळे कर्करोगाचा धोका वाढतो. तज्ज्ञांच्या मते, जर या रंगांमुळे त्वचेमध्ये एलर्जीची समस्या उद्भवली असेल, किंवा जर ते डोळ्यांत गेले तर आपल्याला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. चला तर, जाणून घेऊया अशा रासायनिक कृत्रिम रंगांनी होणारे नुकसान आणि त्यापासून बचावण्याचे मार्ग…
जेव्हा हे रंग आपल्या त्वचेवर लावले जातात, तेव्हा यामुळे खाज सुटणे, लालसरपणा, पुरळ, पुळ्या इत्यादी दुष्परिणाम होऊ शकतात. परंतु, जर हे रंग डोळ्यांत गेले तर ते इतके धोकादायक असू शकते, ज्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या रंगांमुळे डोळ्यांमध्ये खाज सुटणे, जळजळ होणे, एलर्जी या सामान्य समस्य व्यतिरिक्त, यातील रसायनामुळे आपल्या डोळ्यांची दृष्टी देखील जाऊ शकते. हिरव्या रंगामुळे विशेषतः डोळ्यांना मोठे नुकसान होऊ शकते.
सिल्वर आणि लाल रंगात कार्सिनोजेनिक घटक आढळतात. अशा परिस्थितीत त्वचेवर हे रंग लावल्यानंतर, सूर्यप्रकाशाच्या तीव्र प्रकाशामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढतो. आपण जर दम्याचे रुग्ण असाल, तर रासायनिक रंग आपल्यासाठी आणखी गंभीर समस्या बनू शकतात. म्हणूनच, या रंगांनी होळी खेळण्याऐवजी आपला सण नैसर्गिक रंगांनी साजरा करणे चांगले (Holi 2021 know the harmful side effects of chemical colors).
सर्व प्रथम लक्षात ठेवा की, जर हे रंग डोळ्यांत गेले तर डोळे चोळण्याची चूक करू नका. सर्व प्रथम साध्या पाण्याने डोळे धुवा. परंतु, हे लक्षात ठेवा की, डोळे धुतताना जोरात पाणी शिंपडू नका. डोळे धुतल्यानंतर गुलाबाच्या पाण्याचे काही थेंब डोळ्यात घाला आणि काही काळ डोळे मिटून झोपून राहा. परंतु, जर समस्या अधिक दिसत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
त्वचेवर होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी या पद्धती वापरा!
त्वचेला रंगांच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी त्वचेवर नारळ तेल किंवा मोहरीचे तेल चांगल्या प्रकारे लावा. ते वापरल्याने रंग थेट आपल्या त्वचेवर लागणार नाही. परंतु, रंग आपल्या त्वचेवर लागला तरीही आपण त्वरित पाण्याने स्वच्छ करा.
जर आपण पाण्याचे रंग तयार करत असाल, तर बीटरूट कापून घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे पाणी लाल रंगाचे होईल. त्याच वेळी, रात्रभर पाण्यात हळद आणि झेंडूची फुले टाकून पिवळा रंग तयार केला जाऊ शकतो.
कोरडे रंग तयार करायचे असतील, तर तुम्ही हळदीमध्ये पीठ घालून पिवळा रंग तयार करू शकता. लाल रंग तयार करण्यासाठी, जास्वंदाची फुले सुकवा आणि तिची पावडर तयार करून, लाल रंग बनवा. जर, हे सोपे वाटत नसेल, तर आपण हर्बल गुलालसह सुक्या रंगाची होळी खेळू शकता.
(Holi 2021 know the harmful side effects of chemical colors)
सर्वाधिक धोकादायक रक्ताचा कर्करोग, प्रारंभिक लक्षणे दिसल्यास सावधगिरी बाळगा
लठ्ठपणा कमी करण्यासाठी प्रयत्न करतायत? मग, आजच आहारामध्ये ‘हे’ समाविष्ट करा
किवी आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा फायदे https://t.co/cUqNVdKB2R #Kiwi | #HealthCare | #healthtips
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 25, 2021