मुंबई : लोक त्वचेची काळजी घेण्यासाठी बऱ्याचदा स्क्रबिंगचा पर्याय वापरतात. त्वचेची काळजी घेण्याच्या नित्यकर्मांमधील ही एक महत्त्वाची पायरी आहे. स्क्रबिंगशिवाय आपण आपल्या त्वचेवरील साठेलेल प्रदूषण, धूळ कण आणि मृत त्वचा काढून टाकू शकत नाही. यानंतरच आपण आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग करता. त्याच प्रकारे आपण स्क्रबद्वारे आपल्या त्वचेमध्ये नवीन तजेला आणू शकता (Home made Brown sugar face scrub).
यासाठी बाजारात बरेच स्क्रबर्स उपलब्ध आहेत. परंतु, आपण आपल्या घराल्या गोष्टींचा वापर करून देखील स्क्रब तयार करू शकता. ‘ब्राऊन शुगर’ चेहरा स्क्रबिंगसाठी एक चांगला पर्याय आहे. ब्राऊन शुगरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन-बी आणि आपल्या त्वचेचे पोषण करणारे इतरही अनेक घटक असतात.
आपल्या त्वचेसाठी ब्राऊन शुगर खूप चांगली आहे आणि ती कोणत्याही प्रकारची हानी पोहोचवू न देता आपल्या त्वचेला एक्सफोलीट करते. यामुळे केवळ आपली त्वचा हायड्रेट राहत नाही तर त्यास आर्द्रता देखील देते. तसेच, त्वचेतील ओलावा कायम राहतो.
– ब्राऊन शुगर आणि नारळाच्या तेलाचा स्क्रब तयार करण्यासाठी, या दोनहू घटकांना एकत्रित मिक्स करावे आणि त्यामध्ये दोन ते तीन थेंब सुगंधी तेल मिक्स करावे. त्या सर्व घटकांना मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. आता ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांसाठी गोलाकार मोशनमध्ये स्क्रब करा. नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा (Home made Brown sugar face scrub).
– मध आणि ब्राऊन शुगर स्क्रब तयार करण्यासाठी, एक चमचा कच्च्या मधामध्ये, एक चमचा ब्राऊन शुगर घाला. आता त्यात एक चमचा नारळ तेल किंवा ऑलिव्ह तेल घाला. दोन ते तीन थेंब सुगंधी तेल घाला आणि मिक्स करा. आता ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांसाठी मसाज करा. यानंतर ते 5 मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर राहू द्या आणि नंतर पाण्याने स्वच्छ करा.
– व्हॅनिला आणि ब्राऊन शुगर स्क्रब तयार करण्यासाठी, एक चमचा व्हेनिला अर्क एक चमचा ब्राऊन शुगरमध्ये मिसळा. त्यात नारळ तेल आणि व्हिटामिन ई तेल मिक्स करा. आंघोळ करण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर ही पेस्ट लावा आणि 10 मिनिटांसाठी चांगले स्क्रब करा. नंतर ते कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
– ऑलिव्ह ऑईल आणि ब्राऊन शुगर स्क्रबसाठी अर्धा कप ब्राऊन शुगरमध्ये दोन चमचे ऑलिव्ह तेल मिक्स करा. याची पेस्ट बनवून चेहरा आणि मानेवर लावा. सुमारे 10 मिनिटे स्क्रब करा आणि नंतर पाण्याने धुवून टाका.
– ग्राउंड कॉफी आणि ब्राऊन शुगर स्क्रब तयार करण्यासाठी ब्राऊन शुगरमध्ये ग्राउंड कॉफी चांगली मिसळा. आता व्हॅनिला अर्क आणि नारळ तेल सम प्रमाणात टाकून मिसळा आणि पेस्ट तयार करा. सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करा आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
(टीप : सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Home made Brown sugar face scrub)
Skin Care | मसूर डाळीच्या फेसपॅकने उजळेल चेहऱ्याचे सौंदर्य, वाचा या फेसपॅकचे फायदे…#SkinTalks । #skincaretips । #skincareroutine । #MasoorDalFacePackhttps://t.co/msuWwdP369
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 2, 2021