मुंबई : मासिक पाळी, पिरियड्स हे शब्द जरी उच्चारले तरी अनेक मुलींच्या कपाळावर आठ्या पडतात. दर महिन्याला 5 दिवस सहन करावा लागणार त्रास हा कोणत्याही मुलीला नकोसा (periods pain relief) असतो. पिरियड्समध्ये महिलांना होणारा त्रास कमी करण्यासाठी त्या अनेकदा गोळ्या खातात. ज्यामुळे तुमच्या शरीरावर दुष्परिणाम होतात. मात्र काही घरगुती उपायांनी (periods pain relief) तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता असे मत सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनी व्यक्त केले आहे.
रजुता दिवेकर यांच्यानुसार, कोणत्याही महिलेला पिरियड्सचा त्रास हा पहिल्या 2-3 दिवस जास्त होतो. पिरियड्समध्ये तुमच्या पोटातील आणि गर्भाशयातील स्नायू आखडतात. त्यामुळे मासिक पाळीत पोटात दुखणे, पाय दुखणे, डोकं दुखणे या गोष्टींचा त्रास महिलांना सहन करावा लागतो. पण जर तुम्ही योग्य आहार घेत नसाल, तर तुम्हाला पिरियड्समध्ये जास्त त्रास सहन करावा लागतो.
नुकतंच रुजुता दिवेकर यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनुसार पिरियड्समध्ये होणारा (periods pain relief) त्रास कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करु शकता.
पिरियड्सचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय