मुंबई : आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टमध्ये समस्या असल्यास अतिसार अर्थात डायरियाची समस्या निर्माण होते. ही एक पाचन संस्थेशी निगडीत समस्या आहे, जी सहसा बॅक्टेरिया किंवा व्हायरस इन्फेक्शनमुळे उद्भवू शकते. या दरम्यान पोटात गोळा येणे, सूज येणे, उलट्या होणे यासारख्या समस्या उद्भवतात. अतिसार ही एक सामान्य समस्या आहे. परंतु, कधीकधी तब्येत इतकी खराब होते की एखाद्याला रुग्णालयात दाखल करावे लागते (Home Remedies for treating Diarrhoea).
अतिसार बरा करण्यासाठी अनेक प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. परंतु, या औषधांऐवजी अतिसार रोखण्यासाठी आपण घरगुती उपचार देखील करू शकता. यासाठी अतिसाराची कारणे आणि घरगुती उपचारांबद्दल जाणून घेतले पाहिजे.
सामान्यत: दोन प्रकारचे डायरिया असतात. पहिला आहे ‘एक्यूट डायरिया’ जो काही तासांपासून दोन दिवसांपर्यंत असू शकतो. यामध्ये अधिक उपचाराची गरज भासत नाही. दुसरा आहे ‘क्रोनिक डायरिया’ जो अनेक आठवडे त्रास देऊ शकतो. यामुळे कधीकधी डिहायड्रेशन होऊ शकते. डिहायड्रेशनमुळे हृदयाची गती वाढणे, डोकेदुखी, थकवा, घसा खवखवणे आणि तोंड कोरडे पडणे असा समस्या वाढतात.
डायरियामध्ये शरीरातून जास्तीत जास्त पाणी बाहेर टाकले जात असल्याने डिहायड्रेशन समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून कप पाण्यात, 6 चमचे साखर घालून ते पाणी प्या. यादरम्यान कॅफिनेटेड ड्रिंक पिणे देखील टाळा. त्याऐवजी साखर मीठ घातलेले पाणी जास्तीत जास्त प्या.
डायरिया दरम्यान योग्य आहार घेतल्याने त्वरित आराम मिळतो. अतिसारादरम्यान फायबरयुक्त पदार्थ कमी खा. खिचडी, दलिया, बेक केलेला बटाटा, चिकन सूप अशा सहज पचणाऱ्या पदार्थांचे सेवन करा. याव्यतिरिक्त, आपण गाजर आणि केळी देखील खाऊ शकता (Home Remedies for treating Diarrhoea).
प्रोबायोटिक्स हे एकप्रकारचे चांगले बॅक्टेरिया आहेत, जे फार्मेंटेड अन्न पदार्थ आणि दह्यामध्ये आढळतात. हे प्रोबायोटिक्स पाचन तंत्रासाठी फायदेशीर असतात. प्रोबायोटिक बॅक्टेरिया आतडे आणि पचन संस्था मजबूत करण्यास मदत करतात. यासाठी आपण पनीर, डार्क चॉकलेट, ऑलिव्ह, लोणचे, चीज, दही इत्यादी पदार्थ खाऊ शकता.
डायरिया दरम्यान आपण कॅमोमाईल चहा, आल्याचा चहा, ग्रीन टी किंवा लेमन टीचे सेवन करू शकता. कॅमोमाईल चहामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. जे पोटातील समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असतात. आल्याचा उपयोग पोटाच्या विविध समस्यांवर उपचार करण्यासाठी केला जातो. आपण चहात टाकून आल्याचे सेवन करू शकता. आले आपली पचन क्रिया सुरळीत करण्याचे कार्य करते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)
(Home Remedies for treating Diarrhoea)
Herbal Tea Benefits | हिवाळ्याच्या दिवसांत चहा-कॉफीऐवजी प्या ‘हर्बल टी’, आजारांचा धोका होईल कमी!#HerbalTea | #HealthBenefits | #Tea | #GreenTeahttps://t.co/DkhUwhJUcS
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 9, 2021