हिवाळ्यात ग्लोइंग स्किनसाठी मधात मिसळा ‘या’ गोष्टी, त्वचा दिसेल चमकदार

| Updated on: Nov 28, 2024 | 8:13 PM

हिवाळ्यात कोरडी त्वचा असणे सामान्य आहे, परंतु कधीकधी ही समस्या खूप वाढते. त्यामुळे चेहरा चमकदार आणि मुलायम ठेवण्यासाठी योग्य स्किनकेअर रूटीन खूप गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही मधात या गोष्टी मिसळून फेसपॅक बनवू शकता. हे त्वचेला ओलावा प्रदान करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

हिवाळ्यात ग्लोइंग स्किनसाठी मधात मिसळा या गोष्टी, त्वचा दिसेल चमकदार
Follow us on

हिवाळ्यातील थंड वातावरणामुळे आपल्या चेहऱ्यावर याचा परिणाम होत असतो. तसेच त्वचा कोरडी पडणे सामान्य आहे. पण यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. जरी हे सामान्य असले तरी त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर ही समस्या आणखी वाढू शकते. त्याचवेळी कोरडेपणामुळे खाज सुटणे, जळजळ होणे, लालसरपणा देखील उद्भवू शकतो. त्यामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी पडू नये म्हणून योग्य स्किनकेअर रूटीन चा अवलंब करणं गरजेचं आहे. कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि चेहरा चमकदार करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात, विविध प्रकारच्या ब्युटी प्रॉडक्ट्सचा वापर करतात आणि घरगुती उपायांचा ही अवलंब करतात.

स्किनकेअरसाठी घरगुती उपाय प्रभावी तर असतातच, शिवाय त्वचा चमकदार होण्यासही मदत होते. त्वचा चमकदार ठेवण्यासाठी तुम्ही मधाचा वापर करू शकता. तसेच मधात काही गोष्टी मिसळून फेसपॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकता. चला तर मग जाणून घेऊयात.

मधाचा फेस पॅक

हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. हे चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवर चमक येण्यास आणि डाग कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर दुधात असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेच्या मृत पेशी कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते. यामध्ये असलेले प्रोटीन आणि फॅट त्वचेला ओलावा देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. याकरीत तुम्ही एका बाऊलमध्ये २ चमचे हळद, १/२ चमचा मध आणि ३ चमचे दूध घेऊन चांगले मिक्स करून पेस्ट तयार करा. स्वच्छ हातांनी किंवा कापसाने तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावा. गोलाकार मोशनमध्ये लावून चेहऱ्याला मसाज करा, नंतर ही पेस्ट १५ ते २० मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा धुवा.

दूध आणि मध

मध हे आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेसाठीही फायदेशीर ठरू शकते. यामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकतात. दुधात थोडे मध मिसळून चेहऱ्यावर लावू शकता. हे लावताना सर्कुलेशन मोशनमध्ये चेहऱ्याला मसाज करा, नंतर १० मिनिटे ठेवल्यानंतर चेहरा धुवा. मध आणि दूध दोन्ही त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करतात. तसेच त्वचेचे हायड्रेशन आणि रंग सुधारण्यासाठीही हा उपाय उपयुक्त ठरू शकतो.

कोरफड आणि मध

कोरफडमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतात जे त्वचेला हायड्रेट करण्यास आणि त्वचेवर उमटणारे चट्टे कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतात. त्वचेला ओलावा देण्यासाठी आणि मऊ बनवण्यासाठी मध फायदेशीर आहे. ही पेस्ट तयार करण्यासाठी एक चमचा कोरफड जेल आणि एक चमचा मध एकत्र करून चेहऱ्यावर लावा. १५-२० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका. याने तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येईल आणि त्वचा मॉइश्चरायझ करण्यास मदत होईल.

कोणतीही उपाय अवलंबण्यापूर्वी, जाणून घ्या की तुमच्या त्वचेला या नैसर्गिक घटकांची ऍलर्जी नाही ना? तुमची त्वचा जर संवेदनशील त्वचा असल्यास, प्रथम तयार केलेला पॅक टेस्ट करा आणि नंतर त्याचा वापर करा. तसेच आठवड्यातून दोनपेक्षा जास्त वेळा हे घरगुती उपाय करणे टाळा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)