घरात मोलकरणी समोर कधीच करु नका ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा…

| Updated on: Dec 01, 2024 | 2:43 PM

घरातील नोकरांना काही गोष्टी कळल्या तर घराची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे काही गोष्टींची चर्चा नोकरांच्या समोर करू नये. योग्य काळजी घेतल्यास घर आणि कुटुंब सुरक्षित राहू शकते.

घरात मोलकरणी समोर कधीच करु नका या 5 गोष्टी, अन्यथा...
Follow us on

सध्या प्रत्येकाच्या घरात मदत करणारा कोणी ना कोणी तरी असतो. नोकर किंवा मोलकरीण घरात असणं आता सामान्य गोष्ट झाली आहे. ज्या घरात पती- पत्नी दोघेही कामावर जातात तिथे तर मोलकरीण असतेच असते. घरात कुणी तरी मदतीला असावं म्हणून मोलकरीण ठेवली जाते. तिच्या भरवश्यावर अख्खं घर सोडून लोक कामावर जातात. विश्वासू मोलकरीण मिळावी म्हणून तिच्यासाठी पाहिजे तेवढा पैसाही मोजला जातो. मोलकरीण किंवा नोकरदारांवर जेवढा पैसा मोजला जातो, तेवढीच ट्रिटमेंटही चांगली मिळते. अनेक लोक तर घरातील नोकरांशी घरातील सदस्यांप्रमाणेच व्यवहार करत असतात.

याच कारणामुळे अनेक नोकरदारांना घरातील पुरेपूर माहिती असते. हा खरं तर प्लस पॉइंटही आहे आणि मायनस पॉइंटही आहे. मात्र, एखादा नोकर जर चुकीचा निघाला आणि त्याने घरातील सर्व माहिती बाहेर सांगितली तर मोठं नुकसान होऊ शकतं. घराची सुरक्षाच धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अशा काही गोष्टी असतात की त्या नोकरांना कधी माहीत असता कामा नये. त्यातील पाच गोष्टी तर अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या नोकरांना कधीच माहीत असता कामा नये.

घराशी संबंधित माहिती

तुमच्या घरातील लॉकरमध्ये पैसे आणि दागिने असतील तर त्याची माहिती नोकरदारांना अजिबात देऊ नका. त्यांच्यापासून लॉकरचं लोकेशन लपवलं तर सर्वोत्तम. लॉकरमधून तातडीने काही काढायचं असेल तर त्यावेळी नोकर तिथे नाहीये ना याची खात्री करा. नोकरांना तिजोरीचं लोकेशन आणि पासवर्ड कधीच कळता कामा नये.

पैशाशी संबंधित गोष्टी

तुम्ही म्हणाला यात मोठी गोष्ट काय? पण तुम्हाला भाजीपाला, किराणा सामान याबाबत सावध केलं जात नाहीये. तर तुम्ही शॉपिंग करून आला असाल तर आणलेलं सामान नोकरदारांसमोर उघडू नका. त्या सामानाच्या किंमतीवर चर्चा करू नका. तुम्ही मोलकरणीला महिन्याला दोन हजार रुपये देता. आणि तिच्यासमोर हजारो रुपयांच्या वार्ता केल्या तर ते घातक ठरू शकतं. जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील तर त्याची चर्चाही नोकरांसमोर करू नका. तसेच फोनवर बोलतानाही नोकरांना ऐकायला जाणार नाही याची काळजी घ्या.

प्रवासाची माहिती

दरम्यान, तुमचा बाहेर जाण्याचा प्लान असेल तर तुम्ही कधी जाणार, कधी येणार, कुठे जाणार, किती वाजता येणार याची माहिती नोकरांना कळू देऊ नका. घरात नोकरदार नसतील तेव्हाच या गोष्टीची चर्चा करा. तुम्ही दोन तीन दिवस दिसला नाही आणि नोकरांनी विचारलं तर थोडंसं बाहेर गेलो होतो, एवढं बोलून विषय टाळा.

मुलांशी संबंधित माहिती

मुलं कोणत्या शाळेत आहेत, त्यांची फि किती आहे. तो कुठे क्लासेसला जातात, त्यांना कोण नेतं आणि कोण घेऊन येतं, त्यांच्या शाळा, क्लासेसचा टायमिंग काय आहे, त्यांना तुम्ही किती पॉकेटमनी देता, त्यांना कुठे फिरायला घेऊन जाता आदी माहितीची नोकरांसमोर चर्चा करू नका.

मोबाईल आणि इंटरनेटची माहिती

मोबाईल आणि इंटरनेटची माहितीही नोकरांसमोर चर्चा करू नका. या माहितीमुळे तुमची डिटेल बाहेर येईल आणि संपूर्ण बँक खाते खाली होऊ शकतं. त्यामुळे या गोष्टीची चर्चा घरात करू नका. तसेच तुम्ही कितीचा मोबाईल घेतला, त्याची किंमत काय? आदी गोष्टींचीही चर्चा करू नका.