मुंबई : केसांच्या चांगल्या गुणवत्तेसाठी आणि गळती रोखण्यासाठी ‘हेअर कंडिशनर’ खूप महत्वाचे आहे, असे अनेक केस तज्ज्ञांचे मत आहे. म्हणूनच, बहुतेक लोक केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरतात. परंतु बाजारात मिळणाऱ्या या महागड्या कंडिशनर्सचा प्रभाव केवळ काही काळ केसांवर राहतो, त्यानंतर ते पुन्हा खराब होऊ लागतात. जर, आपण देखील बाजारात मिळणारे अनेक महागडे कंडिशनर वापरुन पाहिले असतील, तर आता त्यांना कायमचे बाय-बाय म्हणा. त्याऐवजी घरच्या घरी नैसर्गिक हेअर कंडिशनर बनवून त्याचा वापर करा. या नैसर्गिक हेअर कंडिशनरमुळे केसांची वाढ सुधारेल आणि ते मजबूत व चमकदार बनतील (Homemade hair conditioner for hair care).
– दही स्वतः एक अतिशय उत्तम नैसर्गिक हेअर कंडिशनर आहे. जर, दह्यात मध आणि खोबरेल तेल मिसळले तर, हा एक चांगला हेअर कंडिशनर ठरू शकतो. हे मिश्रण सुमारे अर्धा तास केसांना लावावे, नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवावे.
– कोरफड देखील केसांसाठी खूप प्रभावी मानला जातो. त्याचे कंडिशनर तयार करण्यासाठी प्रथम चाकूच्या मदतीने कोरफडच्या पानांमधून गर बाहेर काढा. त्यानंतर, त्यात एक लिंबू पिळून दोन्ही घटक चांगले मिसळा आणि केसांना लावा. हे मिश्रण सुमारे अर्धा तास केसांवर लावा आणि नंतर केस धुवा.
– केळीचा वापर केसांच्या कंडिशनिंगसाठीही केला जातो. यासाठी एक केळी, दोन चमचे खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह तेल, एक चमचा मध, अर्धा लिंबू, दोन चमचे दही एकत्र मिसळा आणि मिक्सरच्या मदतीने बारीक पेस्ट बनवा. एका तासासाठी ही पेस्ट केसांना लावा आणि नंतर मग केस धुवा.
– कोणत्याही प्रकारचे अधिकचे कष्ट न घेता मुलायम केस हवे असतील, तर कंडीशनर म्हणून व्हिनेगर वापरा. केसांसाठी व्हिनेगर खूप उपयुक्त आहे. केसांना शॅम्पू केल्यावर, एक मगमध्ये साधारण 10 ml व्हिनेगर घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घाला. आता हे मिश्रण केसांवर लावा. हे सिरम आपल्या केसांवर थोडावेळ राहू द्या. काही वेळाने आपले केस साध्या पाण्याने धुवा (Homemade hair conditioner for hair care).
– दह्यामध्ये अंडी मिसळून हे मिश्रण देखील केसांना लावता येते. हे एक उत्तम कंडीशनर मानले जाते. हा पॅक सुमारे अर्धा तास केसांवर अप्लाय करा आणि नंतर केस कोमट पाण्याने धुवा.
– नारळाच्या तेलात कांद्याचा रस व लिंबाचा रस मिसळा आणि हे तेल आपल्या केसांमध्ये लावा. हे खूप चांगले कंडिशनर म्हणून देखील काम करेल. थोड्या वेळाने आपले केस स्वच्छ धुवा.
आपल्या केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी आणि ते चमकदार होण्यासाठी, केस धुतल्यानंतर कंडीशनिंग करणे महत्वाचे आहे. तसे, बाजारात आधीपासूनच बऱ्याच प्रकारचे कंडिशनर्स आहेत, जे आपल्या केसांना ठराविक काळासाठी चमकदार बनवू शकतात. परंतु, या कंडिशनर्समध्ये रसायने खूप जास्त प्रमाणात असता. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ती खूप घातक सिद्ध होतात. ही रसायने आपल्या केसांना रुक्ष आणि निर्जीव बनवतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Homemade hair conditioner for hair care)
Homemade Soap | चमकदार, निरोगी त्वचा हवीय? घरच्या घरी बनवा केमिकलमुक्त साबण…#HomeMadeSoap | #NaturalSoap | #skincaretips | #skincareproducts https://t.co/0WhD8AZYdq
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 21, 2021