Hair Care| रुक्ष केसांच्या समस्येने हैराण? घरगुती ‘कंडिशनर’ने दूर करा ही समस्या…

| Updated on: Feb 15, 2021 | 10:36 AM

आपल्या केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी आणि ते चमकदार होण्यासाठी, केस धुतल्यानंतर कंडीशनिंग करणे महत्वाचे आहे.

Hair Care| रुक्ष केसांच्या समस्येने हैराण? घरगुती ‘कंडिशनर’ने दूर करा ही समस्या...
केळीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. जे आपल्या केसांना आश्चर्यकारक फायदे देतात. मधात अँटी-ऑक्सीडंट्स भरपूर असतात. जे केस चमकदार करतात. उन्हाळ्यात केळी आणि मधाचा पॅक तयार करा आणि केसांना लावा. यामुळे केस कोरडी होत नाहीत.
Follow us on

मुंबई : केसांच्या समस्येमुळे लोक खूपच त्रस्त आहेत. केस आपले सौंदर्य वाढवतात आणि आपले व्यक्तिमत्वही खुलून दिसते. धावपळीच्या आयुष्यामुळे आपण आपल्या केसांची जास्त काळजी घेऊ शकत नाही. परंतु असे दिसून आले आहे की, आपण केस धुता आणि नंतर बरेचदा केस कोरडे व निर्जीव दिसतात. शैम्पू केल्यावर आपल्या केसांतील तेल निघून जाते आणि स्काल्प कोरडी होते, ज्यामुळे त्यांना पुरेसे पोषण मिळत नाही (Homemade natural hair conditioner for dry and rough hair).

आपल्या केसांना योग्य पोषण मिळण्यासाठी आणि ते चमकदार होण्यासाठी, केस धुतल्यानंतर कंडीशनिंग करणे महत्वाचे आहे. तसे, बाजारात आधीपासूनच बऱ्याच प्रकारचे कंडिशनर्स आहेत, जे आपल्या केसांना ठराविक काळासाठी चमकदार बनवू शकतात. परंतु, या कंडिशनर्समध्ये रसायने खूप जास्त प्रमाणात असता. आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ती खूप घातक सिद्ध होतात. ही रसायने आपल्या केसांना रुक्ष आणि निर्जीव बनवतात.

जर आपण देखील केमिकल बेस्ड कंडिशनर वापरत असाल, तर ते आपली केस गळतीची समस्या वाढवतील. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशा कंडिशनरविषयी सांगणार आहोत, जे पूर्णपणे केमिकल मुक्त आणि नैसर्गिकरित्या बनवलेले. ज्याच्या वापराने आपले केस चमकदार होतील.

कोरफड

कोरफड आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध आहे. हे केवळ आपल्या त्वचेची काळजी घेत नाही, तर आपल्या केसांसाठीही फायदेशीर ठरतात. यामुळे आपले केस चमकदार होतात. कोरफडयुक्त हेअर कंडिशनर बनवण्यासाठी, प्रथम कोरफडच्या पानांतून गर काढा. आता एक चमचे लिंबाचा रस, 4 चमचे कोरफड जेलमध्ये घाला. आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावा आणि सुमारे 10 मिनिटे आपल्या केसांवर तसेच राहू द्या. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने आपले केस स्वच्छ करा (Homemade natural hair conditioner for dry and rough hair).

दही आणि अंडी

दही आपल्या केसांवर नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करते आणि अंडी आपले केस मऊ आणि सुंदर बनवतात. या दोघांच्या पेस्टचा केसांवर खूप चांगला परिणाम होतो. ते तयार करण्यासाठी, एका भांड्यात अंडे घ्या आणि चांगले फेटा. आता यात दही घाला आणि दोन्ही चांगले मिक्स करा. हे मिश्रण केसांवर लावा आणि किमान 10 ते 15 मिनिटे ठेवा. यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा.

व्हिनेगर

व्हिनेगर आपल्या केसांसाठी सर्वोत्कृष्ट कंडिशनर मानला जातो. हे आपले केस कोमल आणि मऊ करते. केसांना शॅम्पू केल्यावर, एक मगमध्ये साधारण 10 ml व्हिनेगर घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घाला. आता हे मिश्रण केसांवर लावा. हे सिरम आपल्या केसांवर थोडावेळ राहू द्या. काही वेळाने आपले केस साध्या पाण्याने धुवा.

केळे

केळी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपल्या केसांसाठी देखील ते तितकेच प्रभावी आहे. आपण इच्छित असल्यास, केळीसह घरच्या घरी देखील कंडिशनर बनवू शकता. ते तयार करण्यासाठी पिकलेली केळी मॅश करून घ्या. आता त्यात दोन चमचे ऑलिव तेल आणि एक चमचे मध घालून चांगले मिसळा. आता हे मिश्रण आपल्या केसांवर लावा आणि अर्ध्या तासासाठी तसेच द्या. नंतर आपले केस पाण्याने स्वच्छ धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Homemade natural hair conditioner for dry and rough hair)

हेही वाचा :