दिवाळी म्हणलं की फराळ, गोड पदार्थ आलेच. यामुळे आपण जास्त खातो आणि मग आपल्याला पोटाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. याचा जास्त त्रास अॅसिडिटी होणाऱ्यांना होतो. सणासुदीनंतर अॅसिडिटी नियंत्रित करण्यासाठी जीवनशैलीतील काही बदल करायला हवेत, याविषयी आज आम्ही उपाय सांगणार आहोत.
आजकालची जीवनशैली आणि खाण्यापिण्यातील अॅसिडिटी गॅसची समस्या खूप त्रासदायक आहे. वेळेवर नीट खाल्ले नाही किंवा जास्त खाल्ले आणि तेलकट पदार्थ जास्त खाल्ले तर अॅसिडिटीची समस्या वाढण्याचा धोका असतो.
अॅसिडिटीची समस्या केव्हा वाढते?
अॅसिडिटी ही एक सामान्य पाचन समस्या आहे. आपण झोपण्यापूर्वी खूप जड अन्न खाता तेव्हा ही समस्या उद्भवते. परंतु, उशीरा खाणे आणि उशीरा झोपणे ही आजकाल सवय झाली आहे. यामुळे अॅसिडिटीची समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते.
रिकाम्या पोटी केळी खा
सकाळी उठताच पोटात जडपणा, जळजळ किंवा आंबट ढेकर येण्यास सुरुवात होते. तज्ज्ञांच्या मते अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रिकाम्या पोटी केळी खाणे खूप फायदेशीर आहे.
केळी अॅसिडचा प्रभाव कमी करते
केळी पचनक्रियेसाठी खूप चांगली असून सहज पचते. यामुळे अॅसिडचा प्रभाव कमी होतो. केळीमध्ये पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते आणि अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या टाळतात.
रिकाम्या पोटी केळी खाणे
केळी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी एक-दोन केळी खाल्ल्याने अॅसिडिटीपासून आराम मिळेल. याशिवाय दही किंवा कोशिंबीरसोबतही केळी खाऊ शकता.
झोपण्यापूर्वी तीन तास आधी जेवण करा
अॅसिडिटीची समस्या टाळण्यासाठी झोपण्याच्या किमान तीन तास आधी जेवण करावे. जेणेकरून तुम्हाला अन्न पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकेल. याशिवाय झोपण्यापूर्वी भूक लागल्यास खिचडी किंवा काही हलके पदार्थ खावे.
एक ग्लास गरम पाणी प्या
सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने अॅसिडिटी कमी होईल. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी प्यायल्याने अॅसिडिटी वाढते.
(टीप – लेखात सामान्य ज्ञानाच्या आधारे माहिती दिली आहे. कोणतीही कृती किंवा उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ल्या घ्या.)