नवी दिल्ली – मस्त गाणी, पेटलेली शेकोटी, कुटुंबीय मित्र-मैत्रिणींसोबत गप्पा मारत घेतलेला जेवणाचा आनंद.. नवीन वर्षाचे (new year welcome) स्वागत करताना आपल्या सर्वांच्या सेलिब्रेशनच्या (celebration) काही अशाच आयडिया असतात ना. पण प्रत्येक व्यक्तींच मागील वर्ष उत्तम गेलंच असेल असं नाही, किंवा प्रत्येकाला नववर्षाचं सेलिब्रेशन करायची इच्छा असेलंच असंही नाही. जर तुमचं 2022 हे वर्ष चांगलं गेलं नसेल किंवा मागील वर्षाच्या खराब आठवणींमुळे तुमचा आत्ता सेलिब्रेशनचा मूड नसेल तर काही खास उपाय (ideas) जाणून घ्या, ज्यामुळे नवं वर्ष खास होईल.
जुन्या वर्षाला असं करा बाय-बाय
मागच्या वर्षातील काही अप्रिय आठवणींचा पगडा नवीन वर्षावरही असेल तर निराश होऊ नका. त्या आठवणी मागे सोडा आणि नव्या वर्षाची नवी सुरुवात करा. पार्टीला जायची इच्छा नसेल तर घरी राहून गेल्या वर्षात झालेल्या चांगल्या गोष्टींची यादी करा. तसेच 2022 मध्ये कोणत्या गोष्टी किंवा घटनांमुळे तुम्हाला त्रास झाला याबद्दल एका कागदावर लिहून नंतर तो कागद फाडून टाका किंवा जाळून टाका. असे केल्याने तुमचं मन हलकं होईल व बरं वाटेल.
तुमच्या यशाचे सेलिब्रेशन करा
2022 जरी वाईट गेलं असलं तरी त्यामध्ये काही चांगल्या गोष्टीही घडल्या असतीलंच ना. या वर्षात तुम्ही काही गोष्टी अचिव्ह केल्या असतील, तर त्याचे सेलिब्रेशन करावे. तुमची प्रगती, तुमची अचिव्हमेंट याबद्दल आनंद व्यक्त करा.
नवं वर्ष कसं घालवायचं ते तुम्ही ठरवा
बऱ्याच लोकांना असं वाटतं की नवीन वर्ष असं काही नसतं, फक्त तारीख बदलते. पण तरीही नव्या वर्षआंचे एक खास महत्वं असतं. तुम्हाला नव्या वर्षाची सुरूवात कशी करायची ते तुम्हीच ठरवा. पार्टीला जायचे नसेल तर नका जाऊ, घरात एकटं राहूनही तुम्ही तुमचे सेलिब्रेशन करू शकता. स्वत:च्या संगतीत राहूनही तुम्हाला आनंद मिळू शकेल.
स्वत:चे लाड करा
नवीन वर्षात प्रवेश करताना स्वत:ची किंमत ओळखा आणि स्वत:ची काळजी घ्या. बाहेर जाऊन पार्टी करायची नसेल तर घरात राहून तुमच्या आवडीचा एखादा पदार्थ बनवून खा. आवडीचं पुस्तक वाचत, किंवा एखादा चित्रपट बघत वेळ घालवा. असं केल्याने तुम्हाला आनंद वाटेल आणि नव्या वर्षाची चांगली सुरूवात करता येईल.