मुंबई : हिवाळ्याच्या मोसमात बाजारात गुळाची आवक बरीच वाढते. गुळात प्राकृतिक उष्णता असल्याने, थंडीच्या मोसमात गुळ खाण्याला पसंती दिली जाते. बरेच लोक इतर दिवशीही रोजच्या पदार्थांत साखरेऐवजी गुळ वापरतात. गुळाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, आजकाल बाजारात नफा मिळत असल्याने बनावट गुळ बनवण्याचे प्रमाण वाढले आहे (How to check the purity of jaggery).
बनावट गुळ आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. भेसळयुक्त गुळाच्या सेवनाने आपल्या शरीराचे मोठे नुकसान होऊ शकते. शुद्ध गुळ आणि बनावट गुळ ओळखण्याचा अतिशय सोपा मार्ग आहे. यावरून आपण खरेदी केलेला गुळ शुद्ध आहे की, बनावट आहे हे शोधून काढू शकता.
गुळाच्या पौष्टिक गुणधर्मांमुळे त्याला एक सुपर फूड देखील म्हटले जाते. गुळ आपल्या शरीरास डिटॉक्सिफाई करते. कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, जस्त, प्रथिने आणि व्हिटामिन बी यासारखे पौष्टिक घटक त्यात भरपूर प्रमाणात आढळतात. गुळात प्राकृतिक उष्णता असते, त्यामुळे आपले शरीर आतून उबदार राहते. म्हणूनच थंडीच्या दिवसांत गुळ खाणे लाभदायक ठरते. मात्र, शुद्ध गुळ समजून आपण ज्या गुळाचे सेवन करत आहोत, त्याचा तुमच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, गुळ सेवन करण्यापूर्वी एकदा त्या गुळाची शुद्धता नक्की तपासून पाहा.
सध्या नफा मिळत असल्याने बनावट गुळाचा व्यवसाय शिगेला पोहोचला आहे. भेसळयुक्त गुळामध्ये कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट ही रसायने टाकली जातात, जी शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. वजन वाढण्यासाठी गुळामध्ये कॅल्शियम कार्बोनेट टाकला जातो, तर सोडियम बायकार्बोनेट योग्य रंग येण्यासाठी वापरला जातो (How to check the purity of jaggery).
गुळाची खरेदी करत असताना, नेहमी रंगाने जास्त तपकिरी असेल असा गुळच निवडा. भेसळयुक्त असल्याने पिवळसर किंवा हलका तपकिरी रंग असलेला गुळ निवडू नका. ऊसाच्या रसातील काही अशुद्धतेमुळे आणि उकळल्यामुळे होणारी रासायनिक अभिक्रिया यामुळे त्याचा रंग गडद लाल किंवा तपकिरी होतो. यानंतर, त्यात काही नैसर्गिक गोष्टी घालून गुळाची अशुद्धता दूर केली जाते.
बाजारात तुम्हाला पांढरा, हलका पिवळा किंवा काहीसा अधिक लाल (चमकदार) रंगाचा बनावट गुळ देखील मिळेल. जर, आपण तो बनावटी गुळ पाण्यात टाकला तर, त्यातील भेसळयुक्त पदार्थ पाण्याच्या तळाशी बसतील आणि शुद्ध गुळ पाण्यात पूर्णपणे विरघळून जाईल. त्यामुळे गुळ घेताना नेहमी पाण्यात टाकून त्याची शुद्धता तपासा.
(How to check the purity of jaggery)
Food | हिवाळ्यात साखरेऐवजी गुळाचे अधिक सेवन आरोग्यासाठी अतिशय लाभदायक!https://t.co/dP2M4XlID7#Jaggery #healthcare
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2020