Soap For Skin: तुमच्या त्वचेप्रमाणे योग्य साबणाची अशी करा निवड

| Updated on: Dec 28, 2022 | 9:54 AM

आपण आपल्या त्वचेसाठी ज्याप्रमाणे ब्युटी प्रॉडक्ट्सची निवड करतो त्याचप्रमाणे साबणाची निवड करतानाही आपल्या त्वचेचा पोत कसा आहे हे लक्षात ठेवणे महत्वाचे ठरते.

Soap For Skin: तुमच्या त्वचेप्रमाणे योग्य साबणाची अशी करा निवड
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – मुलायम आणि चमकदार त्वचा (soft and glowing skin) ही सर्वांनाचा हवीहवीशी वाटते, पण त्यासाठी त्वचेची काळजी (skin care) घेणे खूप महत्वाचे असते. अनेकदा आपण आपली त्वचा स्वच्छ करण्यासाठी साबण वापरतो. पण बाजारातील कोणताही विकत घेतलेला साबण अंघोळीसाठी किंवा चेहरा धुण्यासाठी वापरला जातो. मात्र प्रत्येक साबण आपल्या त्वचेवर वेगवेगळ्या प्रकारे काम करतो. ज्याप्रमाणे आपण आपल्या त्वचेसाठी ज्याप्रमाणे ब्युटी प्रॉडक्ट्सची पारखून निवड करतो त्याचप्रमाणे साबणाची (soap for skin) निवड करतानाही आपल्या त्वचेचा पोत कसा आहे हे लक्षात ठेवणे महत्वाचे ठरते.

नॉर्मल त्वचेसाठी

नॉर्मल स्किन म्हणजेच सामान्य त्वचा ही खूप तेलकट किंवा खूप कोरडी नसते. म्हणूनच अशा त्वचेसाठी न्युट्रल असा साबण निवडावा. केवळ कोरड्या त्वचेसाठी किंवा तेलकट त्वचेसाठी बनवलेला साबण कधीही वापरू नका. चुकीचा साबण वापरल्याने तुमच्या त्वचेची छिद्रे बंद होऊ शकतात. यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. तुम्ही हर्बल साबण वापरू शकता.

हे सुद्धा वाचा

तेलकट त्वचा

तुमची त्वचा तेलकट असेल तर त्वचेचे पीएच संतुलन राखणारा साबण निवडा. तेलकट त्वचेमध्ये जास्त सेबम तयार होतो, त्यामुळे ब्रेकआउट्स होण्याची शक्यता अधिक असते. ज्या साबणामध्ये कोरफड, टी ट्री किंवा सी-सॉल्ट असे घटक असतील, अशा साबणाची निवड करून तो वापरावा.

कोरडी त्वचा

कोरड्या त्वचेला बऱ्याच वेळेस खाज सुटते, ज्यामुळे ड्राय पॅचेस दिसू शकतात. त्यामुळे ज्या साबणामध्ये ग्लिसरीन, कोको बटर, नारळाचे तेल किंवा शिया बटरचे घटक असतील अशा साबणाची तुमच्या त्वचेसाठी निवड करा.

कॉम्बिनेशनयुक्त त्वचेसाठी

कॉम्बिनेशन त्वचेमध्ये कोरड्या आणि तेलकट त्वचेचे दोन्ही गुणधर्म असतात. जर तुमची त्वचा देखील कॉम्बिनेशनयुक्त असेल तर तुम्ही केवळ तेलकट किंवा केवळ कोरड्या त्वचेसाठी बनवला जाणारा साबण निवडू नका. तसेच संवेदनशील त्वचेसाठी, तुम्ही नैसर्गिक घटकांचा समावेश असलेला आणि तुमच्या त्वचेला हानी पोहोचवणार नाही असा साबण निवडा.