Best Tips for smelly shoes : पावसाळ्याला लवकरच सुरूवात होणार असून या दिवसात वातावरणात आर्द्रता असते. त्यामुळे पायांना येणारा घाम, किंवा पावसाच्या पाण्यामुळे आपल्या चपला, बूटही ओले (wet shoes) होतात. आणि ते लवकर वाळत नाहीत. त्यामुळे दुर्गंध (smelly shoes) तर येतोच पण त्यामुळे पायाला फंगल इन्फेक्शनही होऊ शकते.
यामुळे आपल्या पायाला त्रास होऊ शकतो, तसेच दुर्गंधामुळे बूट घालणेही नकोसे वाटू शकते. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर चपलांमधील दुर्गंध घालवण्यासाठी काही सोप्या टिप्सचा अवलंब करू शकता.
लिंबाची साल वापरा
घामामुळे चपलांना आलेला वास सहजासहजी जात नाही. अशावेळी त्यामध्ये रात्रभर लिंबाची साल ठेवावी. संत्रं किंवा लिंबू यांसारख्या फळांच्या फ्रेश वासामुळे चपलांमधील दुर्गंध कमी होण्यास मदत होते.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा हा मॉयश्चर वेगाने शोषून घेतो. त्याचसोबत तो दुर्गंध कमी करण्यासही मदत करतो. बूट ओले असतील तर त्यात थोडा बेकिंग सोडा शिंपडा व रात्रभर ठेवा. सकाळी ते कोरडे होतील व घाण वासही दूर होईल.
न्यूजपेपर ठरेल उपयोगी
बुटांमधून वास येत असेल व ते ओले असतील तर कोरडे करण्यासाठी त्यात कागदाचे तुकडे पसरवून ठेवा. त्यामुळे ओलावा शोषला जाईल आणि दुर्गंधही कमी होईल.
टॅल्कम पावडर
बुटांमधून येणारा दुर्गंध काढण्यासाठी त्यात टॅल्कम पावडर फवारा. त्यामुळे दुर्गंध कमी होईल. चपला खूपच ओल्या असतील त्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि उन्हात वाळवा.
फ्रीजरचा वापर
चपलांमधून खूप वास येत असेल तर त्या प्लास्टिकच्या बॅगमध्ये गुंडाळून रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवा. यामुळे बॅक्टेरिया आणि फंगस मरण्यास मदत होईल. सकाळी चपला बाहेर काढा, बुटांचा वास गायब होईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)