मुंबई : सूर्याची किरणे नेहमी शरिरासाठी वाईट असतात असं नाही (How To Protect Your Skin From Sun). यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन-डी मिळतो, जो आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. हिवाळ्यात याच उन्हामुळे आपल्या शरिराला उब मिळते. पण, अधिक काळ सूर्य प्रकाशात राहणे तुमच्या त्वचेसाठी घातक ठरु शकते. यामळे तुमची त्वचा डॅमेज होऊ शकते (How To Protect Your Skin From Sun).
सूर्याच्या हानिकारक युव्ही किरणांमुळे त्वचेवर फाईन लाईन्स, सुरकुत्या, काळे डाग आणि फ्रीकल्स येऊ शकतात. आपल्या वयापेक्षा मोठं दिसणे यामागे सूर्य किरणे प्रमुख कारण आहे, कारण त्यामुळे आपली त्वचा निस्तेज होते. त्वचेचा उन्हापासून बचाव करणे अत्यंत सोपं आहे.
या ‘पाच’ पद्धतींनी तुम्ही उन्हापासून स्वत:च्या त्वचेचा बचाव करु शकता.
सूर्याची उन्ह सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सर्वाधिक असते. या दरम्यान, बाहेर पडू नये. त्यामुळे तुमच्या त्वचेला नुकसान होऊ शकतं. जर दुपारी घराबाहेर पडावंच लागत असेल तर तुमची त्वचा पूर्णपणे कव्हर असेल हे सुनिश्चित करुनच घराबाहेर पडा.
आपण सनस्क्रीनकडे दुर्लक्ष करतो. त्वचेला उन्हापासून वाचवायचं असेल तर सनस्क्रीन हा सर्वोत्तम पर्याय आहे. सनस्क्रीन खरेदी करताना एसपीएफ हा सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यामुळे त्वचेच्या सुरक्षेसाठी एसपीएफ 30 असलेला सनस्क्रीन खरेदी करा (How To Protect Your Skin From Sun).
सनस्क्रीनचा प्रभाव पूर्ण दिवसभर राहत नाही. याचा प्रभाव फक्त 2 ते 3 तासांसाठीच असतो. त्यामुळे दिवसभरात वारंवार सनस्क्रीनचा उपयोग करा.
जर तुम्हाला कुठल्या कामासाठी उन्हात घराबाहेर पडावं लागत असेल तर नेहमी लांब बाहीचे कपडे घाला. फुल स्लीव्ह्जचे कपडे घातल्याने सूर्याच्या किरणांपासून तुमच्या त्वचेची सुरक्षा होईल.
जास्त वेळ उन्हात राहिल्याने त्वचा मोठ्या प्रमामात डॅमेज होते. त्यामुळे तुमची त्वचा आणि तुमचं वय यात साम्य दिसत नाही. तुम्ही वयापेक्षा मोठ्या दिसू लागता. त्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव करण्यासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
Winter Lipstick Trends | हिवाळ्यात ट्रेंडमध्ये आहेत ‘हे’ लिपस्टिक शेड्स, हटके लुकसाठी नक्की ट्राय कराhttps://t.co/NzeLopBrcj#Winter #LipStickTrends #LipstickShades #BeautyTips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 8, 2020
How To Protect Your Skin From Sun
संबंधित बातम्या :
beauty tips | फक्त ‘या’ 6 गोष्टी करा आणि मिळवा तजेलदार चेहरा
Beauty Tips | ‘चारकोल’ने त्वचा बनेल नितळ, ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा!
Beauty Tips | डोक्याला खाज येतेय, त्रस्त आहात?, ‘या’ आयुर्वेदिक टिप्स ट्राय करु शकता