पुन्हा-पुन्हा तोच ॲसिडिटीचा त्रास? तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये करा ‘हे’ बदल

| Updated on: Mar 18, 2025 | 1:14 AM

चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याशी संबंधित समस्यांमुळे अपचन किंवा अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. जर तुम्ही तुमच्या आहारात काही छोटे बदल केले तर तुम्हाला वारंवार होणाऱ्या अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळेल.

पुन्हा-पुन्हा तोच ॲसिडिटीचा त्रास? तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये करा हे बदल
Acdt
Image Credit source: Getty Images
Follow us on

प्रत्येकाच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी तसेच खराब जीवनशैली यामुळे अनेकांना ॲसिडिटीचा त्रास होत असतो. त्यामुळे ही एक सामान्य समस्या बनली आहे. यामुळे लोकांना पोटफुगी किंवा छातीत जळजळ यासारख्या समस्या निर्माण होतात. पण कधीकधी काही लोकांना जास्त अ‍ॅसिडिटी होऊ लागते, ज्यामुळे अ‍ॅसिडिटीपासुन आराम मिळावा यासाठी त्यांना औषधे घ्यावी लागतात. जर तुम्हालाही सारखी अ‍ॅसिडिटीची समस्या सतावत असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही.

कारण आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की, तुमच्या खाण्याच्या सवयी बदलून तुम्ही अ‍ॅसिडिटीची समस्या टाळू शकता. जेव्हा पोटात जास्त प्रमाणात आम्ल तयार होते तेव्हा अन्ननलिकेमध्ये जळजळ होऊ शकते. जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तुमच्या आहारात कोणते बदल करावेत हे तज्ञांकडून जाणून घ्या.

मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळा

हल्ली प्रत्येकजण बाहेरील मसालेदार आणि तेलकट पदार्थ खात असतात. दरम्यान अशा पदार्थांचे अधिक सेवन तुमच्या पोटात अ‍ॅसिडिटीचे उत्पादन वाढवू शकतात, ज्यामुळे आम्लपित्त होऊ शकते. तळलेले किंवा मसालेदार अन्न तुमच्या आहाराचा भाग बनवू नका. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की तुम्ही तुमच्या आहारात साधे अन्न आणि ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा.

आंबट पदार्थ टाळा

लिंबू, टोमॅटो, द्राक्षे आणि संत्र्यांमध्ये नैसर्गिक आम्ल असते, त्यामुळे तुम्‍ही जेव्हा या फळांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या वाढू शकते. जर तुम्हाला वारंवार अ‍ॅसिडिटीचा त्रास होत असेल तर या गोष्टी खाऊ नका. अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी केळी किंवा पपईचा समावेश करून ही फळे तुम्ही खाऊ शकता.

जास्त पाणी प्या.

तुम्हाला जर वारंवार अ‍ॅसिडिटी होत असेल तर जास्त प्रमाणात पाणी प्या. कारण पाणी पोटात पचन सुधारण्यास मदत करते. अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. तथापि, जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिणे टाळा, कारण यामुळे पोटातील आम्ल पातळी वाढू शकते. दिवसभरात किमान २ लिटर पाणी प्या.

फायबरयुक्त पदार्थ

तुमच्या आहारात ओट्स, संपूर्ण धान्य, फळे आणि हिरव्या भाज्या असे फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. हे पदार्थ आम्लपित्तच्या समस्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. फायबरचे सेवन तुमचे पचन सुधारते, तसेच पोटात आम्लाचे उत्पादन नियंत्रित करते. हे पचनसंस्था निरोगी ठेवते आणि आम्लपित्तची समस्या कमी करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)