नवी दिल्ली : आपल्या चेहऱ्यावर किंवा हाता-पायांवर, अथवा शरारीवरही बऱ्याच वेळेस काही नकोसे केस (unwanted hair) असतात. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी विविध उपाय केले जातात. वॅक्सिंग, थ्रेडिंग याप्रमाणेच रेझरचा वापर करून शेव्हिंगही (shaving) केले जाते. मात्र हे नको असलेले केस काढून टाकताता अनेक वेळा आपली त्वचा (skin cut) कापली जाते. अनेकजणांना इच्छा नसतानाही हा वेदनादायक क्षण अनुभवावा लागतो. तुम्हालाही कधीतरी हा अनुभव आलाच असेल ना ? मात्र, शेव्हिंग करताना कापले गेल्यास त्याचा सामना करण्यासाठी आणि त्या जखमेची, वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी तुम्ही विविध उपायांचा अवलंब करू शकता. त्यामुळे भविष्यात तुम्हाला पुव्हा कधीही अशा वेदनादायक स्थितीचा सामना करावा लागणार नाही.
शेव्हिंग कट्सपासून तुम्ही स्वतःचे संरक्षण कसे करू शकता ते जाणून घेऊया.
1) दर वेळेस आंघोळीच्या वेळी शेव्हिंग करावे. कारण असे केल्याने त्वचा मॉइश्चराइज्ड राहील, ज्यामुळे कट होण्याचा धोका कमी होईल. बहुतेक प्रकरणांमध्ये, कोरड्या त्वचेवर शेव्हिंग केल्यास किंवा योग्य काळजी न घेता असा प्रकार केल्यास कापली जाण्याची शक्यता निर्माण होते.
2) नेहमी फ्रेश आणि नवे ब्लेड वापरा. कारण जुन्या ब्लेडची धार कमी होते. त्यामुळे शेव्हिंग करताना कापले जाण्याचा धोका वाढतो.
3) शेव्हिंग करताना पुरेशी काळजी घ्या. घाईघाईत शेव्हिंग करणे टाळावे. तसेच तुमची त्वचा कोरडी असेल तर पाण्याने धुवून त्वचा ओलसर करावी व नंतरच शेव्हिंग करावे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही त्वचेवर साबण देखील वापरू शकता.
शेव्हिंग करताना कापले गेल्यास काय उपाय करावेत ?
1) शेव्हिंग करताना त्वचा कापली गेल्यास चालू असलेल्या नळाखाली कापलेला भाग धुवा. जेणेकरून जखमेवर साचलेली कोणतीही घाण पाण्याखाली स्वच्छ होईल. .
2) जेथे कापले असेल त्या भागावर स्वच्छ कापड, कापसाचा बोळा किंवा टिश्यू दाबून ठेवा. जेणेकरून रक्तस्त्रावर थांबेल.
3) रक्तस्त्राव नियंत्रित करण्यासाठी बर्फाचा तुकडा येऊ शकतो. कारण बर्फामुळे जळजळ आणि वेदना बर्याच प्रमाणात कमी होतात.
4) जखम झाल्यावर कोणताही संसर्ग होऊ नये यासाठी त्यावर अँटी-बायोटिक औषध अथवा मलम लावावे.
5) योग्य मॉयश्चरायझर वापरा. कारण मॉयश्चरायझर तुमची त्वचा ओलसर ठेवण्यास मदत करतात.
6) जखम बरी होईपर्यंत शेव्हिंग करणे टाळावे. अन्यथा जखम चिघळू शकते.