नवी दिल्ली – सर्व स्त्रियांना लांब , घनदाट केस असणे (thick hair) खूप आवडते. केस हा स्त्रियांचा सर्वात आवडता दागिना आहे. म्हणूनच त्वचेप्रमाणेच त्या केसांचीही विशेष काळजी घेण्यात (hair care) कोणतीही कसर सोडत नाही. पण आजच्या व्यस्त जीवनात अयोग्य आहाराच्या सवयी आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेप्रमाणेच केसांवरही (effect on health) वाईट परिणाम होतो. विशेषत: प्रत्येक स्त्री ही केस पातळ होणे व ते गळणे याबद्दल तक्रार करताना दिसते.
केसांची काळजी घेण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने मिळतात, पण त्यामध्ये घातक रसायने असतात आणि केसांवर त्यांचा प्रभाव कायमस्वरूपी रहात नाही. अशा परिस्थितीत केसांसाठी काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. त्यासाठी तुम्ही कोरफडीचे जेल वापरू शकता. कोरफडीमुळे केसांमध्ये दाटपणाही येईल आणि केसही चमकू लागतील.
कोरफडीचे काही हेअर पॅक्स वापरू शकतो.
कोरफड जेल आणि केळ्याचा पॅक
साहित्य – 3 मोठे चमचे केळ्याची पेस्ट
1 मोठा चमचा कोरफड जेल
कृती – एक पिकलेले केळ घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर तुम्ही या पेस्टमध्ये कोरफडीचे जेल मिसळा आणि ही पेस्ट केसांच्या मुळांपासून केसांच्या टोकांपर्यंत लावावे. हा हेअर पॅक केसांवर सुमारे 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर पाण्याने केस स्वच्छ धुवा. केसांमध्ये केळ्याचे थोडेही कण राहिले तर केस तुटू शकतात.
कोरफडीचे जेल आणि अंड्याच्या पांढरा बलकाचा पॅक
साहित्य – 2 अंड्याचा पांढरा भाग
2 मोठे चमचे कोरफडीचे जेल
कृती – एका भांड्यात 2 अंड्याचा पांढरा बलक घ्या आणि त्यात कोरफड जेल मिक्स करा. हे मिश्रण केसांना लावा आणि 30 ते 40 मिनिटे केसांवर राहू द्या. थोड्यावेळाने केस स्वच्छ धुवून टाका. तुम्ही शांपूचाही वापर करू शकता. पण हे लक्षात ठेवा की अंडी लावल्यानंतर केस गरम पाण्याने धुवू नका. असे केल्याने केसांना अंड्यांचा वास येऊ लागतो.
कोरफडीचे जेल आणि मधाचा पॅक
साहित्य – 3 मोठे चमचे कोरफड जेल
1 मोठा चमचा मध
कृती – एका भांड्यात कोरफड जेल आणि मध मिक्स करा. हे मिश्रण केसांच्या मुळापासून टोकांपर्यंत लावा आणि 30 मिनिटांनी केस शांपूने धुवा. आठवड्यातून एकदा ही रेसिपी फॉलो केल्यास केस थोडे दाट होण्यास मदत होते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)