तुम्ही कुठल्याही शहरात फिरायला गेल्यावर राहण्यासाठी हॉटेलमध्ये रूम हवी. हॉटेलमध्ये राहण्यापूर्वी असे अनेक प्रश्न मनात फिरू लागतात की, तुम्ही ज्या खोलीत राहणार आहात, त्या खोलीत छुपा कॅमेरा असेल तर? अनेकांना खाजगी क्षण लीक होण्याची भीती असते आणि ही भीती जोडप्यांमध्ये सर्वाधिक दिसून येते. अशावेळी स्पाय कॅमेरा पकडण्यासाठी तुमच्याकडे डिव्हाईस असणं गरजेचं आहे. याचविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
हॉटेलमध्ये गेल्यावर सर्वात आधी छुपा कॅमेरा आहे की नाही, याची खात्री करून घ्या. कारण, अशा प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. तुमचे खासगी क्षण लीक होऊ शकतात. त्यासाठी आधीच खबरदारी घ्या. आम्ही तुम्हाला हॉटेलमधील छुपा कॅमेरा कसा शोधायचा, याविषयी माहिती देणार आहोत.
तुम्हीही हॉटेलमध्ये रूम बुक केली असेल तर हॉटेलमध्ये छुपा कॅमेरा आहे की नाही हे तुम्ही कसे शोधू शकता? हे तुम्हाला कसं कळणार? छुपा कॅमेरा अशा ठिकाणी ठेवला आहे जिथे कोणालाही सहज दिसत नाही, त्यामुळे खोलीचा प्रत्येक कोपरा नीट तपासा. कॅमेरा कोणतेही उपकरण किंवा कुठेही असू शकतो.
खोलीत गेल्यावर लाईट बंद करा आणि मग आजूबाजूला तपासून पाहा की लाल लाईट दिसतोय का? लाल लाईट असेल तर तो कॅमेराही असू शकतो.
एक डिव्हाईस आहे जे आपल्याला लपलेले कॅमेरे शोधण्यात मदत करू शकते. कॅमेरा डिटेक्टर तुम्ही कोठूनही ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करू शकता. ऑनलाईन कॅमेरा डिटेक्टर 3 हजार ते 8 हजारांपर्यंत उपलब्ध असतील.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हॉटेलच्या खोलीत असाल तेव्हा सावधगिरी बाळगा. एखाद्या गोष्टीवर संशय येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तो कॅमेरा आहे असे समजावे. ताबडतोब ती गोष्ट नीट तपासून पहा. वैयक्तिकरित्या बोलताना किंवा कपडे बदलताना गोपनीयता राखण्यासाठी आपण खोलीतील पडदे बंद करू शकता.
आपल्याला फक्त कॅमेरा डिटेक्टर चालू करावा लागतो आणि मग या डिटेक्टरमधील मजबूत लेझर लेन्सला छुपा आणि पिनहोल कॅमेरा देखील सापडतो. या डिटेक्टरमध्ये इंटेंसिटी डिस्प्ले आहे जो कॅमेऱ्याजवळ गेल्यावर झपाट्याने झपकायला लागतो.
आम्ही दिलेली माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कोणत्याही हॉटेलमध्ये जाताना छुपा कॅमेऱ्याची खबरादीर घ्या. त्यासाठी तुम्ही कॅमेरा डिटेक्टर हे डिव्हाईस देखील वापरू शकतात.