कान दुखतोय ? इन्फेक्शनही झालंय ? हळदीचा वापर करून असा दूर करा तुमचा त्रास …

| Updated on: Apr 29, 2023 | 2:58 PM

How To Use Turmeric For Ear Infection : हळदीतील दाहक-विरोधी गुणधर्म तुमच्या कानाचा संसर्ग बरा करण्यासाठी उपयुक्त आहेत. हळदीचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

कान दुखतोय ? इन्फेक्शनही झालंय ? हळदीचा वापर करून असा दूर करा तुमचा त्रास ...
Image Credit source: freepik
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय जेवणात हळदीचा (Turmeric ) वापर वर्षानुवर्षे केला जात आहे. याच्या वापराने अनेक रोग सहज बरे होऊ शकतात. प्रथिने, चरबी, कार्बोहायड्रेट, कॅलरीज आणि फायबर हे निरोगी पदार्थांमध्ये आढळतात. यासोबतच हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, जे इन्फेक्शनमुळे होणाऱ्या समस्या कमी करण्यात मदत करतात. हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असून कानाच्या संसर्गामध्ये (Ear Infection) देखील वापरले हळद वापरली जाऊ शकते.
कान दुखत असेल किंवा इन्फेक्शन झाले असेल तर त्यासाठी हळदीचा वापर कसा करावा ते जाणून घेऊया.

हळद व नारळाचे तेल

हळदीच्या पावडरच्या वापराने कान दुखणे आणि इन्फेक्शनमध्ये आराम मिळतो. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे कानाच्या नसांना आराम दण्यास मदत करतात. ते वापरण्यासाठी, न चमचे खोबरेल तेलात एक चमचा हळद पावडर मिसळा. त्यानंतर हे मिश्रण 4 ते 5 मिनिटे गॅसवर गरम करा. यानंतर ते गॅसवरून उतरवा आणि कोमट झाल्यावर कानात तेलाचे काही थेंब कापसाच्या साहाय्याने टाका. यानंतर कानाचे छिद्र कापसाने झाकून टाका.

हळदीचे पाणी

या उपायासाठी एक कप पाणी घ्या. त्यात चिमूटभर हळद घालून उकळा. यानंतर हे पाणी गॅसवरून काढून थोडे कोमट होऊ द्या. कोमट पाण्याचे काही थेंब कानात टाका. यामुळे कानातल्या घाणीमुळे होणारा त्रास आणि संसर्ग कमी होतो. तसेच कानातील मळ (Ear Wax)मऊ होऊन सहज बाहेर येतो.

हळद आणि लसणाचे तेल

हे तेल बनवण्यासाठी लसणाच्या 2 ते 3 कळ्या बारीक करा. यानंतर एका पॅनमध्ये सुमारे दोन चमचे खोबरेल तेल टाका. आता त्यात ठेचलेला लसूण आणि चिमूटभर हळद घालून गरम करा. हे तेल साधारण चार ते पाच मिनिटे उकळू द्या. यानंतर गॅसवरून काढून गाळून घ्या. कान दुखत असल्यास या तेलाचे काही थेंब टाका.

मात्र कानाच्या अनेक आजारांमध्ये घरगुती उपायांचा अवलंब करू नये. जर तुम्हाला सतत कानात वेदना होत असतील तर कोणत्याही प्रकारचे तेल वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच, लहान मुलाला कान दुखत असल्यास ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.