मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) नुकतीच तिच्या योगा सेशन दरम्यान स्पॉट झाली आहे. ती बर्याचदा आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर फिटनेस व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असते. अलीकडे रकुलने असाच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती योगा करताना दिसत आहे. या फोटोत रकुल आपली बॉडी स्ट्रेचिंग करताना आणि शरीराचे संतुलन साधताना दिसत आहे (How yoga become stress buster for rakul preet singh).
हा फोटो शेअर करताना रकुलने लिहिले की, ‘शरीर स्टिफ नाही, तर मन आहे.’ योगा केल्यास मन शांत होते. तसेच यामुळे आपला मानसिक ताणही दूर होतो. योगासने केल्याने आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहता. हा फोटो शेअर करताना रकुल प्रीतने तिच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक पोस्टने केली आहे. ती अनेकदा लोकांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरित करत असते.
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री रकुल प्रीत सिंह तिच्या फिटनेससाठी ओळखली जातो. कितीही व्यस्त शेड्युल असले तरी ती आपल्या व्यायामाला प्रथम प्राधान्य देते. ती आपले कसरत सत्र कधीच सोडत नाही. अलीकडे, रकुलचे व्यायाम करतानाचे फोटो समोर आले आहेत, ज्यात तिने नारंगी रंगाचे पट्टे असलेली योगा पँट परिधान केली आहे. या आऊटफिटमध्ये ती बरीच कम्फर्टेबल दिसत आहे.
या अगोदरही तिने सूर्य नमस्कार करतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती आपली टोन्ड बॉडी फ्लाँट करताना दिसली होती (How yoga become stress buster for rakul preet singh).
रकुलच्या वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले, तर तिच्या हातात बॉलिवूड आणि साऊथचे अनेक चित्रपट आहेत. शंकर दिग्दर्शित कमल हासनच्या ‘इंडियन 2’मध्ये ती झळकणार आहे. अजय देवगनच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या एका चित्रपटाच्य शूटिंगमध्ये ती सध्या व्यस्त आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
या अभिनेत्रीने आपल्या करिअरची सुरूवात ‘गिल्ली’ या कन्नड चित्रपटापासून केली होती. यानंतर ती तामिळ चित्रपट आणि तेलगू चित्रपटांमध्येही दिसली. तिने 2014 मध्ये ‘यारियां’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटा नंतर रकुल प्रीत सिंह ‘अय्यारी’ आणि ‘दे दे प्यार दे’ सारख्या चित्रपटात झळकली होती. बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासमवेत ‘मरजावाँ’ या चित्रपटात रकुल प्रीत सिंह दिसली होती.
(How yoga become stress buster for rakul preet singh)
Fashion : रकुल प्रीत सिंह – मौनी रॉयमध्ये फॅशन वॉर, ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तुम्हाला कोण आवडलं?https://t.co/RF1lCiwgib@Roymouni @Rakulpreet #Fashion
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021