Parenting Tips | प्रत्येक मुलाचं बालपण (kids) खूप मजेशीर आणि खोडकर असतं. खोडकरपणामुळे त्यांना ओरडा बसतो. पालक (parents scold kids) मुलांना रागावतातच किंवा खडसावतात. मात्र, पालकांच्या अशा वागण्याचा मुलांवर खोलवर परिणाम होतो. विशेषत: जेव्हा इतर लोकांसमोर ओरडा बसतो, तेव्हा आणखीनच वाईट वाटते.
सार्वजनिक ठिकाणी मुलांना ओरडल्यास त्यांच्यावर मानसिक ताण (mental pressure) येऊ शकतो. अनेकदा मुलं दुसऱ्या व्यक्तींसमोर जायलाही घाबरतात किंवा मग सगळ्या व्यक्तींसमोरच राग दर्शवतात.त्यांच्या मानसिक आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे जाणून घेऊया.
मुलांचे मन अतिशय कोमल, मृदू असते, ते कोणतीही गोष्ट लावून घेतात. अशा परिस्थितीत मुलांना सार्वजनिक ठिकाणी ओरडल्यास त्यांना राग येऊ शकतो. हेल्थलाइन नुसार, मुलांवर ओरडल्यास त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. विशेषत: इतरांसमोर ओरडा बसल्यास मूल हट्टी आणि रागीट होऊ शकतं. पालकांच्या रागामुळे मुलांचं मानसिक आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे त्यांना सार्वजनिक ठिकाणी ओरडू नये.
रागावल्यामुळे मुलांमध्ये अनेक प्रकारचे मानसिक विकार होऊ शकतात, त्यापैकी एक म्हणजे अधिक ताण जाणवणे. अधिक ताणामुळे मुलांच्या वागण्यात बदल होत असतो. तणावामुळे मुलं पालकांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. मुलांना दुसऱ्यांसमोर रागावल्याने त्यांचा अपमान होतो, ज्यामुळे ते पालकांपासून गोष्टी लपवू लागतात. हे तणावाचे एक प्रमुख कारण असू शकते.
इतर व्यक्तींसमोर मुलांवर ओरडल्याने मुलांच्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. आई-वडिल मुलांना ओरडल्यास ते शारीरिकदृष्ट्या कमकुवत होऊ शकतत. शारीरिकरित्या कमकुवत झाल्यामुळे मुलं इतरांना टाळू लागतात व त्यांना भावनिक व शारीरिकदृष्ट्या कमजोर वाटू लागतं. अनेक वेळा तणावामुळे मुले आजारीही पडतात. त्यामुळे पालकांनी मुलांना ओरडणं टाळावं, विशेषत: इतर लोकांसमोर ओरडू नये. मुलांना त्यांची चूक प्रेमान समजवावी व त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.