माणसाच्या आयुष्यात झोपेला खूप महत्त्व आहे. झोप जर व्यवस्थित पूर्ण झाली तर आपण दिवसभर फ्रेश राहातो. कामाचा मूड देखील असतो. आपली कार्यक्षमता वाढते. मात्र याउलट जर तुमची झोप पूर्ण होत नसेल तर तुमची चिडचिड वाढते, तुमची कार्यक्षमता कमी होते. कोणत्याही कामात मन लागत नाही, दिवसभर आळस अंगामध्ये राहातो आणि डोळ्यावर झोप असते. अशा स्थितीमध्ये तुम्ही करत असलेल्या कामात चुका होऊ शकतात. त्यामुळे चांगली झोप हीच चागंल्या आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असं मानलं जातं. जर तुमची झोप पूर्ण होत नसेल आणि असाच प्रकार तुमच्यासोबत अनेक दिवस होत राहिला तर त्यामुळे तुम्हाला इतर आजार होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी काय करता येईल याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. उपाय जाणून घेणार आहोत.
चांगल्या झोपेसाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. अनेक गोष्टींचा परिणाम हा आपल्या झोपेवर होत असतो. ज्यामध्ये कामाचं टेन्शन, अयोग्य आहार आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. मात्र या सर्व गोष्टींसोबतच आणखी एक गोष्ट कारणीभूत आहे ती म्हणजे तुमचा स्क्रीन टाईम, लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा झोपायला जातात, त्यापूर्वी कमीत कमी एक ते दीड तास मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही अशा गोष्टींचा वापर करू नका, यामुळे होत काय की तुम्ही जर झोपेपर्यंत मोबाईल, लॅपटॉप यांचा वापर करत असाल तर तुमच्या मेंदूला, डोळ्यांना त्यांच्या रेटायनाला रात्र झाली तरी हा सदेंश पोहोचतच नाही, त्यातून बाहेर पडणाऱ्या किरणांमुळे प्रकाशामुळे दिवस असल्याचा संदेश जातो, हा चुकीचा संदेश आहे.
त्यामुळे काय होतं की तुमच्या मेंदूमधून मेलोटॉलीन नावाचा स्त्राव सतत स्त्रावत असतो. तो चांगल्या झोपेसाठी अत्यंत आवश्यक असतो. मात्र मेंदूला योग्य तो संदेश न पोहोचल्यामुळे या स्त्रावाचं प्रमाण कमी होतं. त्यामुळे तुम्ही जरी झोपलात तरी तुमची झोप पूर्ण होऊ शकत नाही. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला परत झोपावं वाटतं.