नवी दिल्ली : उन्हाळ्याच्या दिवसात थंड हवा सुखदायक वाटते. त्यासाठी आपण एसीत बसणे, गार पाणी पिणे यासोबतच बर्फाचाही (ice) वापर करतो. हाच बर्फ आपल्या त्वचेसाठीही बराच फायदेशीर असतो. तसेच आईस फेशियलदेखील (ice facial)आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगले मानले जाते. पण हे फेशियल करण्यापूर्वी त्याबद्दलच्या अनेक गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत. चेहऱ्यावर चमक आणण्यासोबतच (glow on skin) बर्फाचे अनेक फायदे आहेत. मात्र हा बर्फ त्वचेसाठी कसा वापरावा, हे माहीत नसेल तर फायद्याऐवजी नुकसान सहन करावे लागू शकते. आईस फेशिअलबद्दल महत्वपूर्ण गोष्टी आणि त्याचे फायदे जाणून घेऊया.
आईस फेशिअलचे आहेत अनेक फायदे
फेशियल साठी चेहऱ्यावर बर्फ वापरण्यामागील खरे शास्त्र हे आहे की ते रक्त (त्वचेच्या) पृष्ठभागावर आणते, ते (त्वचेचा) पृष्ठभाग शांत करते, त्वचा घट्ट करते आणि त्वचेला गुलाबी चमक देते. या संपूर्ण पद्धतीला आइस फेशियल किंवा स्किन आयसिंग म्हणतात. जेव्हा त्वचा थंड करण्यासाठी बाष्पयुक्त नायट्रोजनचा वापर केला जातो तेव्हा त्याला क्रायथेरपी उपचार म्हणतात. हे तंत्र पहिल्यांदा जपानमध्ये 1978 मध्ये संधिवात तज्ज्ञ डॉ. तोशिमा यामागुची यांनी विकसित केले होते. बर्फ त्वचेला उजळ करतो, छिद्र घट्ट करतो आणि फक्त 15 मिनिटांत बारीक रेषा किंवा वयानुसार येणारे डाग, सुरकुत्या कमी करतो.
सूज कमी करण्यास होते मदत
आइस फेशियल हे आपल्या त्वचेसाठी अनेक तऱ्हेने फायदेशीर ठरते. आपल्या शरीरात कुठेही सूज आली असेल, जळजळ होत असेल तर ते कमी करण्यासाठी बर्फ वापरला जातो. हीच गोष्ट चेहऱ्याच्या त्वचेसाठी देखील आहे, आईस फेशियलमुळे लालसरपणा, सूज, जळजळ अशी लक्षणे कमी होतात आणि चेहऱ्याचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. आइस फेशियल हे दाहक घटकांमुळे उद्भवणाऱ्या ट्रिगर्सना शांत करून रोसेसिया आणि मुरुमांशी संबंधित समस्याही कमी करण्यास मदत करते. जर तुम्हाला डार्क सर्कलचा त्रास होत असेल तर तुम्ही आईस फेशियल करून तो त्रासही कमी करू शकता.
मुरूमांची समस्या होते दूर
आईस फेशियलमुळे त्वचेची चिडचिड शांत होते, मुरुमांची जळजळ आणि लालसरपणा कमी होण्यास मदत होते. सुजलेल्या आणि फुगलेल्या चेहऱ्यापासून मुक्त होण्यास यामुळे मदत होते. त्यामुळे त्वचाही चमकदार होते. आईस फेशियल हे सेबममुळे वाढलेल्या छिद्रांपासून मुक्त होण्यासाठी छिद्रांचा आकार कमी करण्यास मदत करते आणि तुमची त्वचा मऊ करते. आईस फेशियल केल्याने चेहऱ्यावरील मुरुमांच्या समस्येपासूनही सुटका मिळते.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)