हिवाळ्यात हाताची त्वचा कोरडी पडली ? फॉलो करा या सोप्या टिप्स

| Updated on: Nov 28, 2024 | 4:30 PM

हिवाळ्यामध्ये त्वचेची आर्द्रता कमी होऊ लागते. आपण फक्त चेहऱ्याची काळजी घेतो मात्र हातांकडे दुर्लक्ष केल्या जाते. अशा परिस्थितीत काही घरगुती उपायांनी हिवाळ्यात हातांची काळजी घेतल्या जाऊ शकते.

हिवाळ्यात हाताची त्वचा कोरडी पडली ? फॉलो करा या सोप्या टिप्स
हिवाळयात अशी घ्या हातांची काळजी
Follow us on

हिवाळा सुरू होताच त्वचेची आर्द्रता कमी होऊ लागते आणि त्वचा कोरडी होते. चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आपण मॉइश्चरायझर वापरतो. पण हातांची काळजी घ्यायला विसरतो. त्यामुळे हातांवर पांढऱ्या रेषा तयार होतात. काही वेळा कोरडेपणामुळे हातांना तीव्र खाज सुटते. या वेळी हाताबरोबरच चेहऱ्याची योग्य काळजी घेणे खूप गरजेचे आहे. अशा परिस्थितीत काही टिप्स जाणून घेऊ ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या हातांची योग्य काळजी घेऊ शकता.

हातांची काळजी घेण्यासाठी घरगुती उपाय

मॉइश्चरायझर वापरा

हातांना कोरडेपणापासून वाचवण्यासाठी मॉइश्चरायझर वापरा. जितक्या वेळा तुम्ही हात धुतात तितक्या वेळा मॉइश्चरायझर लावा. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी देखील मॉइश्चरायझर वापरू शकता.

गरम पाणी टाळा

हिवाळ्यात बहुतेक लोक गरम पाण्याचा वापर करतात. या परिस्थितीत आंघोळीसाठी आणि भांडी धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर कमी करा. त्याऐवजी कोमट पाणी वापरा. जेव्हा तुम्ही कोमट पाणी वापरतात तेव्हा मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका.

पेट्रोलियम जेली

रात्री झोपण्यापूर्वी हातावर पेट्रोलियम जेली वापरा. यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहील आणि त्वचा कोरडी होणार नाही.

स्क्रब वापरा

आठवड्यातून एकदा तरी हातांना स्क्रबिंग नक्की करा. स्क्रबिंग हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास उपायुक्त ठरेल. स्क्रबिंग साठी तुम्ही मध आणि साखरेचा वापर करू शकता.

गुलाब पाणी आणि ग्लिसरीन

हाताची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाब पाण्यामध्ये ग्लिसरीन टाकून देखील वापरू शकता. त्यामुळे हात ओलसर राहतील आणि त्वचेची आर्द्रता टिकून राहील.

दुधाची साय

हाताची काळजी घेण्यासाठी तुम्ही हातांना दुधाची साय देखील लावू शकता. दुधाच्या सायीमध्ये आर्द्रतेचे प्रमाण जास्त असते. दुधाची साय हातांना लावून दहा मिनिटानंतर हात कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.

बदामाचे तेल

त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी बदामाच्या तेलाचा वापर केला जातो. झोपण्याच्या काही वेळ आधी हातांना बदामाचे तेल लावून मसाज केल्याने हात मऊ होतील कोरडेपणा देखील दूर होईल.