मुंबई : भारतीय स्वयंपाक घरात लवंगाचा मसाला म्हणून वापर केला जातो. यामुळे केवळ आपल्या अन्नाची चवच वाढवत नाही, तर शरीराला पौष्टिक घटक देखील मिळतात. प्राचीन काळापासून याचा उपयोग आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून केला जात आहे. यातून बऱ्याच प्रकारची औषधे देखील तयार केली जातात. दररोज याचा उपयोग केल्यास दात, पोट, घसा इत्यादींची समस्या दूर होते. लवंगामध्ये युजेनॉल असते. यामुळे ताणतणाव आणि पोटाशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो (Immunity Booster Clove eat before sleeping at night to get more health benefits).
आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हा छोटासा दिसणारा मसाल्याचा घटक पार्किन्सनसारख्या आजारासाठी देखील उपयुक्त आहे. या मसाल्यामध्ये व्हिटामिन ई, व्हिटामिन सी, फोलेट, रिबॉफ्लेविन, व्हिटामिन ए, थायमिन, व्हिटामिन डी, ओमेगा फॅटी आम्ल, आणि अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.
– रात्री झोपायच्या आधी दोन लवंगा खाऊन आणि एक ग्लास कोमट पाणी पिऊन आपण अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
– रात्री लवंगाचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, अतिसार, आंबटपणा यासारख्या पोटाच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. हे आपल्या पाचक प्रणालीसाठी देखील फायदेशीर आहे.
– लवंगामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. यात सॅलिसिलेटचा एक प्रकार आहे, जो मुरुम रोखण्यास उपयुक्त आहे.
– कोमट पाण्यासह लवंगाचे सेवन केल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. आपण हे दात खाली देखील दाबून धरू शकता. यामुळे वेदना देखील कमी होतील.
– हात पाय थरथरण्याच्या आजाराने ग्रस्त लोक यापासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपायच्या आधी 1 ते 2 लवंगा घेऊ शकतात (Immunity Booster Clove eat before sleeping at night to get more health benefits).
– दररोज लवंगाचे सेवन केल्यास आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते, जी कोरोना कालावधीमध्ये खूप महत्वाची आहे.
– लवंग आपल्याला खोकला, सर्दी, विषाणूजन्य संसर्ग, ब्राँकायटिस, सायनस आणि दम्यापासून मुक्त होण्यास मदत करते.
लवंगमध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिज असतात. आहारात याच्या नियमित वापरामुळे शरीराला पुष्कळ पोषकद्रव्ये पुरवली जातात.
कॅलरी : 6
कार्ब : 1 ग्रॅम
फायबर : 1 ग्रॅम
मँगनीज : 55% – दैनिक मूल्य (डीव्ही)
व्हिटामिन के : 2% डीव्ही
मँगनीज एक महत्त्वपूर्ण खनिज आहे. यामुळे मेंदूची कार्यक्षमता सुरळीत राहते. मजबूत हाडांसाठी देखील लवंगाचे सेवन आवश्यक आहे.
(Immunity Booster Clove eat before sleeping at night to get more health benefits)
मेथीच्या दाण्यांचा फेसपॅक ट्राय करा आणि चेहऱ्यावरील मुरूमांना गुडबाय म्हणा!
आरोग्यासाठी लाभदायी ब्लू टी, जाणून घ्या फुलांपासून बनविलेल्या या अप्रतिम चहाबद्दल
सकाळी उठताच एक ग्लास पाण्यात हिमालयीन मीठ टाकून प्या, पहा आश्चर्यकारक फायदेhttps://t.co/EMxjnzwxHy#himalayansalts |#beneficial |#health |#weightloss
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 15, 2021