मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : इगो वा अहंकार काही वेळेस माणसाला चांगला वाटत असला तरी अनेक वेळा तो समोरच्या दु:ख पोहचवू शकतो. मनुष्यप्राण्यातील अनेक भावनांमुळे जाणता अजाणता समोरच्या व्यक्तीला दु:ख पोहचू शकते. यापैकी भावना एक भावना म्हणजे इगो किंवा अहंकार ज्याबद्दल आपण आज पाहणार आहोत. आपण आपल्या जीवनातील काही प्रसंगी आपल्यातील अहंकाराला गुंडाळून बाजूला ठेवले पाहीजे. तर या लेखात पाहूयात की कोणत्या अशा पाच सिच्युएशनमध्ये आपण आपल्यातील इगोला दूर ठेवले पाहीजेत…
जेव्हा आपल्याला इतरांकडून मदत किंवा सल्ला घ्यायचा आहे. तेव्हा नेहमी इगोला साईडला ठेवले पाहीजे. ज्यामुळे आपल्या एक चांगला सल्ला मिळू शकेल. आणि चुकनही आपण असे कोणतेही चुकीचं काम करायला नको ज्यामुळे भविष्यात आपल्याला अडचण येऊ शकेल. त्यामुळे या सिच्युएशनला इगोला मध्ये आणायला नको. कारण अनेक वेळा निगेटिव्ह फिलींगमुळे आपण अनेक बाबींना नकळत बिघडवू शकतो.
आपण आपल्या प्रेमळ जीवाभावाच्या लोकांबाबत कधी इगोला थारा द्यायला नको. कारण यामुळे आपले नाते खराब होऊ शकते. आणि समोरचा दुखावला जाऊ शकतो. कारण आपल्या प्रेमळ व्यक्ती कधीच हे सहन करणार नाहीत की आपण त्यांच्याबद्दल वाईट विचार करतोय. असा प्रसंग अनेकदा येऊ शकतो. त्यामुळे प्रयत्न कराल की आपल्या आणि प्रेमळ व्यक्ती दरम्यान कधीच इगो यायला नको
अनेकदा दोघांना एकत्र राहाताना कंप्रोमाईज करावे लागते. जर अशा वेळी आपण आपल्यातील इगोला समोर आणले तर नात्यातील गोडवा कायम राहाणार नाही. नेहमी एकाच बाजूने कंप्रोमाईज केल्याने अनेकदा नकारात्मकता वाढते. समोरच्या व्यक्तीला सिच्युएशन वाईट होऊ शकते.त्यामुळे तुम्ही नेहमी प्रयत्न करा की तुमच्या नात्यात दोघांनी समपातळीवर कंप्रोमाईज करायला हवे. कारण कंप्रोमाईज करणे काही वाईट गोष्ट नाही. तसेच प्रयत्न करा की अशा वेळी इगोला बाजूला ठेवायला हवे.
अनेकदा एखाद्याच्या अचिव्हमेंट किंवा यशाने दुसऱ्याला इर्ष्या किंवा जळावू वृत्ती तयार होते. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमचा इगो दुखावतो. आपण मनुष्य असल्याने आपण आपल्या सहकाऱ्यांच्या यशाचे अभिनंदन करायला हवे. आपल्या भविष्यात लागणाऱ्या मदतीसाठी तेच आपल्या सोबत असल्याने आपण त्यांची सुखात सुख मानले पाहीजे. त्यामुळे एकमेकांच्या यशाचे अभिनंदन केले पाहीजे.
अनेकदा आपल्याला काही गोष्टीबाबत काही कल्पना नसते. परंतू तरीही आपण आपल्याला सर्वकाही ज्ञात असल्यासारखे व्यक्त होतो. जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला त्याबाबत विचारतो तेव्हा आपल्याला इगो मध्ये येतो. जर आपले काही चुकत असेल किंवा आपल्यात काही चूक असेल तर आपण त्याची कबूली दिली पाहीजे. परिस्थिती समजून घेतली पाहीजे. आपल्या चूकीची कबूली आपले नाते वाचवू शकते.