हिवाळ्यात चविष्ट आणि स्वादिष्ट पदार्थांचा अस्वाद घेताना तुमच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये चटणी असेल तर तुमच्या तोंडाला पाणी सुटतं. चटणी तुमच्या जेलृवणाची चव वाढवते त्याचं प्रमाणे तुम्हाला अनेक रोगांपासून मुक्त देखील करते. चटण्यांमधील पोषक तत्वं तुमची रोगप्रतिकारकशकिती वाढवतात आणि तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. चटणी बनवताना काही अशा पदार्थांचा उपयोग केला जातो ज्यामुळे तुमचं आरोग्या निरोगी राहाण्यास मदत होते.
हिवाळ्यात तुमच्या आहारामध्ये प्रोटिन, फायबर, कॅल्शियम आणि मॅग्नेशियनम या महत्त्वाच्या घटकांचा समावेश करा. तुमच्या आहारामध्ये चटण्यांमध्ये पोषक घटकांचा भंडार आढळतो त्यामुळे हिवाळ्यात तुमच्या आहारामध्ये चटणीचा समावेश केल्यामुळे तुम्हाला अधिक फायदे होतात. तर हिवाळ्यात जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी या प्रकारच्या चटण्या समावेश करा.
आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते ज्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारतशक्ती वाढते. रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला सर्दी, खोकला किंवा ताप यांच्या सारख्या समस्या होत नाहीत. याशिवाय आवळ्याच्या सेवनामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक मिळते आणि केस मजबूत होतात. आवळा तुमच्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर ठरते. आवळ्याची चटणी तुम्ही चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता.
गाजरात बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहाते. तुमच्या आहारामध्ये गाजरचे सेवन केल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. गाजरची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर उकडून घ्या. त्यानंतर त्यामध्ये मीठ, चाट मसाला आणि कोथिंबीर टाकून सर्व सामग्री मिक्स करा. त्यानंतर या चटणीमध्ये लिंबू पिळा. तिखट हवं असल्यास त्यामध्ये लाल तिखटाचा वापर करी शकता.
मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन आणि फायबर असते ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यासोबतच मुळ्याची चटणी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि तुम्हाला संसर्गाचा आजार होत नाही. मुळ्याची चटणी बनवण्यासाठी मुळा किसून त्यामध्ये लिंबाचा रस, मीठ आणि हिरवी मिरची मिक्स करून स्वादिष्ट चटणी तयार .
लसणात अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, ज्यामुळे शरीराला संसर्गाचे आजार होत नाही. लसणाची चटणी बनवण्यासाठी तुम्ही लसूण बारिक करन त्यामध्ये थोडं तेल, मीठ हिरवी मिरची टाकून स्वादिष्ट चटणी तयार करा.
पुदिन्याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. पुदिन्याचे सेवन केल्यास तुमची पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तुम्हाला जर पोटदुखी किंवा गॅसचा प्रोब्लम असेल तर पुदिन्याच्या चटणीचे सेवन करा यामुळे तुमच्या आरोग्याला निरोगी राहाण्यास मदत होते. पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवा आणि बारिक करून त्यामध्ये मीठ आणि जिरा पावडर घालून चांगले मिक्स करा. यामुळे तुमची चविष्ट पुदिन्याची चटणी तयार.
चटणी बनवण्यासाठी ताज्या भाज्या वापरा
चटणी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी त्यामध्ये थोडे तेल घाला
तुमच्या आवडीनुसार चटणीमध्ये वेगवेगळे मसाले घाला
चटणी पराठे, भजी आणि भातांसोबत खाऊ शकता