तुम्हीही चालवू शकता परदेशात गाडी, अमेरिकेसह ‘या’ देशांत भारतीय ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ला मान्यता!

| Updated on: Dec 15, 2020 | 6:53 PM

भारतीय वाहन परवान्याबाबत माहित नसलेली आश्चर्याची बाब म्हणजे या परवान्यावर आपण केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही वाहन चालवू शकता.

तुम्हीही चालवू शकता परदेशात गाडी, अमेरिकेसह ‘या’ देशांत भारतीय ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ला मान्यता!
Follow us on

मुंबई : रस्त्यांवर वाहन चालवताना आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. बऱ्याचदा हे ड्रायव्हिंग लायसन्स आयडी प्रूफ अर्थात ओळखपत्र म्हणून देखील वापरता येते. भारतीय वाहन परवान्याबाबत (Indian Driving Licence) माहित नसलेली आश्चर्याची बाब म्हणजे या परवान्यावर आपण केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही वाहन चालवू शकता. होय, भारतात बनवलेला तुमचा परवाना परदेशात वाहन चालवण्यासाठीही वैध आहे. या एका लायसन्ससह तुम्ही अनेक देशांत वाहन चालवू शकता. जगभरात असे अनेक देश आहेत जिथे आपण आपल्या परवान्यासह वाहन चालवू शकता (Indian Driving Licence valid in various countries of world).

वास्तविक, भारताचा परवाना काही देशांमध्ये वैध आहे, परंतु प्रत्येक देशानुसार, त्यांचे काही नियम आहेत. या ड्रायव्हिंग लायसन्सद्वारे तुम्ही काही देशांत वाहन चालवू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला तिथल्या आरटीओची परवानगी घ्यावी लागेल. ही परवानगी मिळाल्यानंतरच आपण वाहन चालवू शकता. तो तो देश तुम्हाला वाहन चालवण्याचे परमिट देईल, ज्याला काळाची वैधता असेल. म्हणजेच, काही देशांत ही परवानगी 3 महिन्यांसाठी, तर काही देशांत 6 महिन्यांसाठी वैध आहे. सरळ शब्दात सांगायचे म्हणजे, जेव्हा परमिटची परवानगी 3 महिन्यांपर्यंत वैध राहते, तेव्हा आपण त्या देशात केवळ 3 महिने वाहन चालवू शकता. प्रत्येक देशानुसार ही कालमर्यादा बदलते.

कोणत्या देशात चालेल तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स?

अहवालानुसार ऑस्ट्रेलिया, अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, मॉरिशस, नॉर्वे, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, स्पेन, हाँगकाँग, स्वीडन, सिंगापूर, मलेशिया यासारख्या देशांमध्ये भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वैध आहे. यामध्ये तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये 3 महिने, यूएसएमध्ये 12 महिने, फ्रान्समध्ये 6 महिने, न्यूझीलंडमध्ये 12 महिने, स्वित्झर्लंडमध्ये 1 वर्ष भारतीय परवान्यासह वाहन चालवू शकता. तथापि, प्रत्येक देशाचे रहदारीचे नियम वेगवेगळे आहेत. म्हणून तिथले वाहतुकीचे नियम माहित असणे आवश्यक आहे (Indian Driving Licence valid in various countries of world).

परमिट आवश्यक!

जर, तुम्हाला भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स घेऊन परदेशात वाहन चालवायचे असेल तर, त्यासाठी तुम्हाला आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट घेणे देखील आवश्यक आहे. आपल्या ड्रायव्हिंग परवान्यासह आवश्यक असणारे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग परमिट आरटीओद्वारे मिळवता येते. हे जास्तीत जास्त एका वर्षासाठीच दिले जाते. त्यासाठी तुम्हाला आरटीओमधील फॉर्म 4-एच्या माध्यमातून अर्ज तयार करावा लागेल. या अर्जासह तुम्हाला एक फॉर्म, पासपोर्ट, परवाना, व्हिसा आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यानंतरच तुम्हाला या परमिटची परवानगी मिळू शकते.

(Indian Driving Licence valid in various countries of world)