आता काही दिवसातच आपण 2025मध्ये प्रवेश करणार आहोत. सर्वच जण 2025मध्ये जाण्यासाठी आतूर झाले आहेत. तरुणाईमध्ये तर नव्या वर्षाची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. काहींनी तर कुठे फिरायला जायचं याचा प्लानच केला आहे. काहींनी तर बॅगाही भरून ठेवल्या आहेत. फक्त निघायचीच काय ती तयारी आहे. पण तुम्ही बाहेर फिरायला जाण्यापूर्वी ही बातमी वाचा. 2024मध्ये सेलिब्रिटींना भारतातील काही शहर प्रचंड आवडली. त्यांनी या शहरांना वारंवार भेट दिली. तुम्हीही या शहरात जात आहात का? तसं नसेल तर या शहरांची नावे आजच तुमच्या न्यू ईयर प्लानमध्ये समाविष्ट करा.
जयपुर (Jaipur)
शाहीविवाह सोहळ्यांसाठी राजस्थान ओळखलं जातं. राजस्थानची माहिती आणि अलिशान महाल यामुळे राजस्थानची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. यात जयपूर, जोधपूर आणि उदयपूरमधील वेडिंग स्टेशन तर सर्वाधिक चर्चित आहे. भारतातीलच नव्हे तर विदेशातील स्टार्सही या ठिकाणी येऊन एन्जॉय करत असतात. विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ या शहरात नेहमी फिरायला येतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रो यांना हवा महल दाखवण्यासाठी घेऊन आले होते.
उदयपुर (Udaipur)
उदयपूर सुद्धा सेलिब्रिटिंचं फेव्हरेट वेडिंग डेस्टिनेशन आहे. नद्यानाले आणि उदयपूरच्या किल्ल्यामुळे उदयपूरला खास महत्त्व आलं आहे. या ठिकाणी असंख्य सेलिब्रिटिंचा विवाह झालाय. उदयपूरला पूर्वेचा व्हेनिस म्हटलं जातं. कंगणा रणौत, शिल्पा शेट्टी आणि तापसी पन्नू या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी येतात.
जम्मू कश्मीर (Jammu Kashmir)
जम्मू-काश्मीरला भारताचं स्वित्झर्लंड असं म्हटलं जातं. या ठिकाणी चारही बाजूने बर्फच बर्फ आहे. बर्फाळ डोंगररांगामुळे या ठिकाणचं सौंदर्य खुलून निघालयं. 2024 मध्ये शहनाज गिल, सारा अली खान सारखे कलाकार या ठिकाणी सुट्टी घालायला आले होते. आलिया भट्ट आणि शरवरी वाघ यांनी सप्टेंबर 2024 मध्ये काश्मीर खोऱ्यात ‘अल्फा’ चित्रपटाची शुटिंग केली आणि इथे एन्जॉय केलं होतं.
गोवा (Goa)
भारतामध्ये गोवा सर्वात मोठं टूरिस्ट डेस्टिनेशन मानलं जातं. इथे फिरणं जवळपास प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं. गोव्यात अनेक देशी आणि विदेशी सेलिब्रिटी, पर्यटक दरवर्षी सुट्टीसाठी येतात. गोव्यात शुटिंगही केली जाते. गोव्यात अमिताभ बच्चन नेहमीच सुट्टी घालायला येतात. त्याचप्रमाणे, राजकुमार राव लग्नानंतर पत्नीसोबत गोव्यातच आला होता.
कूर्ग (Coorg)
भारताचा दक्षिण भागही स्वर्गापेक्षा कमी नाही. केरळमधलं कूर्ग हे शहर सेलिब्रिटींचं आवडतं डेस्टिनेशन आहे. हिरवागार जंगलं, आकाशाला भिडणारे डोंगर, तलाव-झरे आणि चहा कॉफीचे मळे तुम्हाला इथेच थांबायला भाग पाडतील. याशिवाय, इंडियन सेलिब्रिटी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मसुरी, दार्जिलिंग, ऊटी, लडाख, डलहौजी, औली आणि ऋषिकेश सारख्या लोकप्रिय डेस्टिनेशन्सवरही जातात.