International Men’s Day 2024: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन का साजरा केला जातो ? काय आहे इतिहास ?

| Updated on: Nov 19, 2024 | 8:38 AM

International Men's Day 2024: आज जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातोय. दरवर्षी जगभरात 19 नोव्हेंबरला हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा रंजक इतिहास आणि महत्त्व या खास निमित्ताने आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

International Mens Day 2024: आंतरराष्ट्रीय पुरुष दिन का साजरा केला जातो ? काय आहे इतिहास ?
आंतरराष्ट्रीय पुरुष दिन का साजरा केला जातो ?
Image Credit source: social media
Follow us on

International Men’s Day 2024: आज जगभरात आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला जातोय. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन समाजातील पुरुषांच्या योगदानाचे कौतुक तर करतोच, शिवाय त्यांच्यासमोरील आव्हानांची जाणीव लोकांना करून देण्याचे काम करतो.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा दिवस स्त्री-पुरुष समानता, पुरुषांचे आरोग्य आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित आहे. समाज, कुटुंब आणि पर्यावरणासाठी त्यांनी दिलेले योगदानही यात नमूद करण्यात आले आहे. जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा रंजक इतिहास, महत्त्व आणि यंदाची थीम.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन का साजरा केला जातो?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा मुख्य उद्देश पुरुषांचे आरोग्य, कल्याण आणि त्यांच्या समाजातील सकारात्मक योगदान अधोरेखित करणे हा आहे. हा दिवस साजरा करण्यामागे अनेक खास कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन म्हणजे पुरुषांचा आवाज बुलंद करण्याची आणि त्यांचा सन्मान करण्याची संधी आहे.

पुरुषांनाही अनेक प्रकारचे संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जावे लागते, याची आठवण हा दिवस करून देतो. या दिवशी आपण केवळ पुरुषांच्या आरोग्यावर चर्चा करत नाही, तर पुरुषांना भेडसावणारा भेदभाव आणि विषमतेचे मुद्देही मांडतो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश असा समाज निर्माण करणे आहे जिथे सर्वांना समान अधिकार आणि संधी मिळतील.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास काय?

1999 साली वेस्ट इंडिजचे प्राध्यापक डॉ. जेरोम टिळकसिंग यांनी वडिलांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक नवा दिवस सुरू केला. त्यांनी या दिवसाला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, असे नाव दिले आणि पुरुषांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी हा दिवस समर्पित केला.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन भारतात कधीपासून साजरा होतो?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा दिवस भारतात 2007 पासून साजरा केला जात आहे, तेव्हापासून लोकांना पुरुषांच्या आरोग्याबद्दल जागरूकता पसरविण्याची आवश्यकता वाटली.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाची यंदाची थीम काय?

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन दरवर्षी एका विशिष्ट विषयावर केंद्रित असतो. यंदा 2024 मध्ये या दिवसाची थीम मेन्स हेल्थ चॅम्पियन ठेवण्यात आली आहे. पुरुषांचे आरोग्य सुधारणे हा या थीमचा विशेष उद्देश आहे.

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कसा साजरा करता येईल?

जनजागृती करा: या दिवसाविषयी आपल्या मित्रांना, कुटुंबियांना आणि समाजातील लोकांना सांगून जनजागृती करू शकता.

इव्हेंट्समध्ये भाग घ्या: तुम्ही तुमच्या भागात आयोजित कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन हा दिवस साजरा करू शकता.

स्वयंसेवक: पुरुषांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या संस्थेत आपण स्वयंसेवक होऊ शकता.

आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे, इतरांना मदत करणे किंवा आपल्या समुदायात सक्रियपणे भाग घेणे यासारख्या आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आपण हा दिवस साजरा करू शकता.