Women’s Day | जागतिक महिला दिन (International Women’s Day) जवळ येतोय. कुणी म्हणतं, डेज साजरे करण्याची आपली संस्कृती नाही. पण प्रत्येक व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली संस्कृती आहे. त्यातच भारतीय माणूस हा उत्सव प्रिय आहे. मग पाश्चात्यांकडून आलेला असला तरी जागतिक महिला दिन साजरा करण्याला काहीच हरकत नाही. किंबहुना आपल्या आयुष्यातील महिलांप्रती आदर भावना व्यक्त करण्यासाठी एक संधी आहे, या दृष्टीने पाहता येईल. तुमच्या घरातील आई, बहीण, पत्नी, वहिनी, काकी, मावशी या सगळ्या महिलांसोबतच बाहेर शाळा, कॉलेज, ऑफिस इतर कार्यालयांत काम करणाऱ्या महिला प्रत्येक आघाडीवर वेगवेगळी झुंज देत असतात. कुणाचं समर्पण सिद्ध होतं तर कुणाचं समर्पण जाहीर होत नाही. आज जागतिक महिला दिनानिमित्त आपण अंतर्मुख होऊया. काही मोजक्या शब्दांद्वारे त्यांना शुभेच्छा देऊया. यासाठीचा हा प्रपंच. महिला दिनानिमित्त काही शुभेच्छा संदेश….
“तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे तुझा संसार
कर्तृत्व अन् सामर्थ्याची ओढून घे नवी झालर
स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर.
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा”
एक यावा असा दिन, ना राहो महिला ‘दीन’ आणि रोजच असावा ‘जागतिक महिला दिन’
“आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू ,
जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा”
तुम्ही करू शकणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टीपैकी एक गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे, स्वतःवर विश्वास ठेवणे आणि काय करायचं आहे हे माहीत असणे – शैयला मॅरे बेथेल
प्रत्येकीकडे गुड न्यूज आहे. तुम्ही किती ग्रेट आहात, तुम्ही इतरांवर किती प्रेम करू शकता आणि काय काय साध्य करू शकता, तुमच्या क्षमता काय आहे हे तुम्हाला माहीत नाही – अॅने फ्रॅंक
तुम्हाला तुमच्यावर सर्वात जास्त कोण प्रेम करतं हे जाणून घ्यायचं असेल तर आरश्यात पाहा – बायरन केटी
खडतर परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर मोठ मोठी शिखरं सर करणाऱ्या माझ्या परिचयातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
काही लोक म्हणतात की स्त्रीचे कोणतेच घर नसते.
परंतु माझे मानणे आहे की स्त्री शिवाय कोणतेही घर नसते.
आमच्या ‘वाघा’सारख्या मित्रांना ‘मांजर’ बनवणाऱ्या तमाम वहिनीसाहेबांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
“इंग्रजीत म्हणतात लेडी, मराठीत म्हणतात महिला, जिच्यामुळे आपण या जगात श्वास घेतो पहिला, अशा स्त्रीचा प्रत्येकाला वाटतो अभिमान कायम करा अशा स्त्रीचा सन्मान Happy Women’s Day !”