IRCTC Tour Package | अवघ्या 5 हजार रुपयांत करा वडोदरातल्या ‘या’ सुंदर ठिकाणांची सफर…

| Updated on: Feb 04, 2021 | 1:15 PM

गुजरातमध्ये फिरण्याची योजना आखात असाल तर, वडोदरा येथे असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याला नक्की भेट द्या.

IRCTC Tour Package | अवघ्या 5 हजार रुपयांत करा वडोदरातल्या ‘या’ सुंदर ठिकाणांची सफर...
अवघ्या 5 हजार रुपयांत करा वडोदरातल्या ‘या’ सुंदर ठिकाणांची सफर
Follow us on

मुंबई : कोरोना विषाणूच्या साथीमुळे लोक खूप अस्वस्थ झाले आहेत. या साथीमुळे लोक बराच काळ घरात अडकून राहिले. अशा परिस्थितीत, आपण कुठेतरी जाण्याचा विचार करत असाल तर, तर भारतीय रेल्वे केटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) साईटवर (www.irctctourism.com) या सहल  योजना पाहू शकता. येथे आपल्याला पर्यटनाचे असे बरेच पर्याय दिले आहेत. ज्याद्वारे आपण या स्वस्तात प्रवास करू शकता. चला तर प्रथम गुजरातमधल्या वडोदरातील हॉलिडे पॅकेजची माहिती घेऊया…( IRCTC Tour Package Vadodara one day trip)

गुजरातमध्ये फिरण्याची योजना आखात असाल तर, वडोदरा येथे असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याला नक्की भेट द्या. हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. जो सुमारे 597 फूट उंचीचा आहे. या व्यतिरिक्त, वडोदरा येथील लक्ष्मी विलास पॅलेस ही इंडो सरासेनिक रिव्हिव्हल आर्किटेक्चरमध्ये बांधलेली एक रचना आहे, जी लंडनमधील बकिंघम पॅलेसपेक्षा जवळपास चार पट मोठी आहे.

‘या’ पॅकेजचा तपशील

– पॅकेजचे नाव : केवडिया टूर एक्स वडोदरा (डे टूर)

– फिरण्याची वेळ – डे टूर

– कुठे जात येईल? : लक्ष्मीविलास पॅलेस,  बडोदा संग्रहालय आणि फोटो गॅलरी, स्टॅच्यू ऑफ युनिटी

– प्रवासाचे दिवस : दर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी ही सहल आयोजित केली जाते. ज्याची सुरुवात 10 डिसेंबर 2020 पासून झाली आहे.

प्रति व्यक्ती पॅकेजची किंमत (1-3 Pax)

एक व्यक्ती : 4900 रुपये

दोन व्यक्ती : 2600 रुपये

तीन व्यक्ती : 1850 रुपये

लहान मुलं (5-11 वर्षे) बेड सहित : 1850

बेड वगळून (5-11 वर्षे) – 1800

(IRCTC Tour Package Vadodara one day trip)

प्रति व्यक्ती पॅकेज किंमत (4-6 Pax)

दोन लोक : 1750

ट्रिपल : 1750

लहान मुलं (5-11 वर्षे) बेड सहित : 1750

प्रवासाचा तपशील

या सहलीसाठी तुम्हाला वडोदरा स्थानक गाठावे. यानंतर, आपण साईट पाहण्यासाठी लक्ष्मी विलास पॅलेस आणि बडोदा संग्रहालयात जाल, त्यानंतर आपण आपले जेवण घ्याल, त्यानंतर संध्याकाळी पुन्हा वडोदरा स्थानकावर ही सहल समाप्त होईल.

या पॅकेजमध्ये बर्‍याच गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स, टॅक्स आणि एसी वाहन इत्यादी सुविधा मिळतील. आपण या पॅकेजमध्ये बर्‍याच गोष्टी वगळू देखील शकता. जसे की सर्व्हिस चार्ज, रूम सर्व्हिस, स्मारकाचे किंवा मंदिरात जाण्याचे तिकिट, टीप व ड्रिंक इत्यादी.

रद्द करण्याचे धोरण (Cancelation policy)

– सहलीच्या 15 दिवसांआधी यात्रा रद्द केल्यास प्रति व्यक्ती 250 रुपये कापले जातील.

– 8 ते 14 दिवसांदरम्यान रद्द केल्यास 25 टक्के खर्च कपात केला जाईल.

– 4 ते 7 दिवसांदरम्यान रद्द केल्यास 50 टक्के खर्च कपात केला जाईल.

– तर, तिकीट बुकिंगच्या 4 किंवा त्यापेक्षा कमी दिवसात प्रवास रद्द केल्यास कोणतीही रक्कम कपात केली जाणार नाही.

(IRCTC Tour Package Vadodara one day trip)

हेही वाचा :