मुंबई : शरिरात हिमोग्लोबिनचं प्रमाण योग्य राखण्यासाठी आयर्नची मोठी गरज असते. एखादी स्त्री गर्भवती असेल तर तिच्या शरिरात योग्य प्रमाणात आयर्न असणं अत्यंत गरजेचं आहे. आयर्न हे हिमोग्लोबिन बरोबरच मायोग्लोबिनचाही एक महत्वाचा भाग आहे. मायोग्लोबिन हे ते प्रोटिन आहे. जे तुमच्या मांसपेशीपर्यंत ऑक्सिजन घेऊन जाण्यास मदत करतं. तिथेच कोलाजिन नावाचं प्रोटीनही त्याचा भाग असतो. कोलाजिन हे हाडांमध्ये आणि कार्टिलेजमध्ये सापडणारं प्रोटीन आहे.(Iron deficiency in pregnancy can lead to many problems)
गर्भावस्थेत आईसोबतच मुलाला विकसीत होण्यासाठी काही पोषक तत्वांची गरज असते. अशावेळी महिलेच्या शरिरातील रक्ताचे प्रमाण दुप्पट होते. त्यामुळे रस्क्तामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण आणि शरिरात ऑक्सिजनचं योग्य प्रमाण ठेवण्यासाठी आयर्नची मोठी गरज भासते. अशावेशी आयर्नची कमतरता जाणवली तर एनिमियासह अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
गर्भावस्थेत प्लेसेंटा विकसित करण्यासाठी आयर्नची आवश्यकता असते. प्लेसेंटा ही ती पिवशी आहे जी महिलेल्या शरिरातून पोषक तत्व आणि ऑक्सिजन घेऊन गर्भनाळेद्वारा बाळापर्यंत पोहचवते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात आयर्नची गरज जास्त असते. अनेक केसेसमध्ये तर पाहायला मिळतं की महिलांमध्ये गर्भधारणेपूर्वीच आयर्नची कमतरता असते. अशावेळी प्रेग्नन्सी दरम्यान आयर्नची गरज अजूनच वाढते.
प्रेग्नन्सीदरम्यान जर काही प्रमाणात एनिमिया झाला असेल तर तो ठीक केला जाऊ शकतो. पण एनिमियाने गंभीर रुप धारण केले असेल तर अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यात इम्युनिटी पॉवर कमी होणं, फुफ्फुस आणि हृदयासंबंधी आजार, वेळेपूर्वी प्रसूती, बाळाचं वजन कमी असणं, बाळामध्ये आयर्नच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
Skin Care | गर्भावस्थेदरम्यान का निर्माण होते मुरुमांची समस्या, वाचा यावरील उपाय…
Iron deficiency in pregnancy can lead to many problems