मुंबई : कंटाळा आला की तो घालवण्यासाठी आपण घोटभर चहा पिण्याचा बेत आखतो. मग कुठे चहाची टपरी आहे का हे शोधतो. तिथे जो उकळत असेल तो चहा पितो. अशाप्रकारे वारंवार चहा पिणे एकवेळ आपल्या शरिराला त्रासदायी ठरू शकते. आपल्याला जर चहा पिण्याची सवय कायम ठेवायची असेल तर लेमन टीला प्राधान्य द्यायला हरकत नाही. कारण लेमन टीचे बरेचसे फायदे आहेत. ही चहा आपल्या आरोग्याला उत्तम अर्थात लाभदायी असल्याचे आरोग्य क्षेत्रातील जाणकारांचेच म्हणणे आहे. (Five Unique Benefits of Lemon Tea; Beneficial for weight loss as well as for ‘these’ ailments)
एक कप चहा आपल्याला ताजेतवाने करते. आपल्या शरिराला आलेला थकवा कुठच्या कुठे पळवते. आपल्याला अॅक्टिव्ह बनवते. बहुतांश लोक आले, वेलची आणि दूधाचा चहा पिण्यात पहिली पसंती देतात. आजकाल चहाचे अनेक प्रकार आले आहेत. वेगवेगळे ब्रॅण्ड्स मार्केटमध्ये दाखल झाले असून ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी सहजासहजी उपलब्ध होऊ लागले आहेत. साध्या चहापेक्षा ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी निश्चितच आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. लेमन टी म्हणजे लिंबू पिळलेली चहा. ही चहा नियमित पिणे एक आरोग्यदायी पर्याय आहे. रक्ताचा पुरवठा सुरळीत ठेवणे, वजन कमी करणे यांसारखे बरेचसे फायदे आहेत.
लिंबू पिळलेली चहा पिणे आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. लेमन टी आपल्या शरिरातील विषाक्त पदार्थ बाहेर फेकून देते. मेटाबॉलिज्ममध्ये सुधारणा करते. यामुळे खाद्यपदार्थांचे एनर्जीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला गती मिळते.
लेमन टी नियमित स्वरुपात घेत राहिल्यास त्याचे आरोग्यावर चांगले फायदे दिसून येतात. अनेकांना खाल्लेले काहीही नीट पचत नाही. त्यांची पचनप्रक्रिया ठीक होत नसते, अशा लोकांनी जर लेमन टी दररोज घेतली तर त्यांची पचन प्रक्रिया उत्तम राहिल. लिंबूमधील सायट्रीक अॅसिड एंजाईमचे प्रोडक्शन करते. याची आपल्याला उत्तम पचन प्रक्रियेमध्ये मोठी मदत होते.
ज्या लोकांना मधुमेह होण्याचा धोका आहे. त्यांनी अवश्य लेमन टी प्यावी. शरिरात इन्सुलिनच्या वाढीमुळे उच्च ब्लड शुगर असते. लिंबूमध्ये ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात ठेवणार्या एंजाईमला संशोधित करण्याची क्षमता असते. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते.
लिंबूची चहा ‘व्हिटॅमिन-सी’चा एक समृद्ध स्त्रोत आहे, जो एक अॅण्टीआॅक्सिडेंट आहे. यामुळे इम्युनिटी वाढते तसेच पेशींना होणारे नुकसान टाळण्यास मदत होते. त्याचबरोबर इतर विविध व्याधी होण्याचा धोका रोखते.
दररोज लेमन टी पिण्यामुळे आपल्या ह्रदयाचे आरोग्य उत्तम राहते. ह्रदयाचे आजार तसेच अॅटॅक येण्याची घटना रोखली जाऊ शकते. लेमन टीमध्ये प्लाण्ट फ्लेवोनोइड्ससुद्धा असतात, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. (Five Unique Benefits of Lemon Tea; Beneficial for weight loss as well as for ‘these’ ailments)
पुण्यातील लॉकडाऊन अधिक कडक होणार, दुपारी 12 नंतर प्रत्येक वाहनाची कडक तपासणी https://t.co/s1HqVaOfYl @PuneCityPolice @puneruralpolice @AjitPawarSpeaks @mohol_murlidhar @MPGirishBapat #PuneLockdown #PuneCoronaUpdate #PuneFightsCorona #punepolice
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 10, 2021
इतर बातम्या
कोरोना काळात हसन मुश्रीफांनी बहिणीसह जवळचे 4 नातेवाईक गमावले, नागरिकांना महत्वाचं आवाहन