शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य देखील चांगले असायला हवे. त्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनातील रोजची पंधरा मिनिटे जरी योगासन आणि प्राणायमसाठी काढली तरी तुमचे आरोग्य सुधारेल. प्राणायमातील अनुलोम – विलोम जास्त अवघड देखील नाही. या आसनात तुम्हाला वज्रासनात किंवा सरळ मांडी घालून पद्मासनात बसावे लागते. यावेळी पाठ सरळ राहील याची काळजी घ्यावी नंतर श्वास बाहेर सोडावा. उजव्या नाकपुडीवरबोट दाबून ठेवावे आणि डाव्या नाकपुडीने श्वास आत खेचावा. त्यानंतर अंगठा हटवून डाव्या नाकपुडीवर ठेवावा. या दरम्यान उजव्या नाकपुडीने श्वास सोडावा.अशाच प्रकारे ही क्रीया एका नाकपुडीतून श्वास घेऊन दुसऱ्या नाकपुडीने सोडावा. रोज अशा प्रकारे काही वेळ अनुलोम- विलोम असा प्राणायमाचा प्रकार केला तर अनेक फायदे मिळतात.
अनुलोम-विलोम करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. पोट खाली हवे. सुरुवातीला पाच मिनिटांपासून करावी. नंतर हे आसन करण्याचा वेळ वाढवत 15 ते 30 मिनिटे करावे. हे आसन करताना वातावरण आरामदायी आणि शांत असायला हवे. तर रोज अनुलोम-विलोम करण्याचा काय फायदा आपल्याला मिळत असतो ते पाहूयात…
अनुलोम-विलोम केल्याने हृदयासाठी खूप फायदा होतो. याच्या अभ्यासाने रक्ताचे वहन वाढते. ब्लड फ्लो सुधारतो. ज्यामुळे ब्लॉकेज होण्याची भीती राहात नाहीत. प्राणायम ब्लड प्रेशर नियंत्रित राखण्यासाठी देखील फायदा होतो. त्यामुळे आपले आरोग्य आणि हृदय हेल्दी राहाते.
रोज अनुलोम- विलोम केल्याने तणावापासून आराम मिळतो. निगेटिव्ह विचारांचा त्रास दूर होतो. मनप्रसन्न होते. त्यामुळे झोप देखील चांगली लागते.
अनुलोम- विलोम केल्याने आपल्या पचन यंत्रणेत मोठा सुधार होतो. यामुळे आपले पचन तंत्र हेल्दी होते. अपचन होणे, पोट फुगणे, गॅसचा त्रास होणे आणि पोटदुखीचा समस्या दूर होण्यास मदत मिळते.
अनुलोम-विलोममुळे फुप्फुसांची ताकद वाढते. हे आसन श्वसनसंबंधित विकारासाठी फायदेमंद असते. ज्या लोकांना ब्रोंकायटिस आणि अस्थमा यांचा त्रास आहे. त्यांनी तर दररोज तज्ज्ञांच्या मदतीने दररोज अनुलोम-विलोम करायलाच हवे.
अनेक लोकांना सायनसची समस्या असते, त्यांना नाक बंद झाल्यासारखे वाटते. नाकातून चित्र विचित्र वास येतो.चव न लागणे, थकायला होणे. चेहऱ्यावर सूज येते. चेहरा दुखू लागतो. अशा समस्यांना अनुलोम-विलोम केल्याने मोठा फायदा होत असतो.