Kaal Bhairav Jayanti 2020 | शिवरूपी ‘काल भैरव’ जयंती, असे असतील पूजा विधी आणि मुहूर्त…

| Updated on: Dec 07, 2020 | 11:49 AM

हिंदू पंचांगानुसार ‘काल भैरव जयंती’ प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते.

Kaal Bhairav Jayanti 2020 | शिवरूपी ‘काल भैरव’ जयंती, असे असतील पूजा विधी आणि मुहूर्त...
Follow us on

मुंबई : 2020 या वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला आहे. आज (7 डिसेंबर) देशभरात ‘काल भैरव जयंती’ (Kaal Bhairav Jayanti 2020) साजरी केली जात आहे. हिंदू पंचांगानुसार ‘काल भैरव जयंती’ प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला साजरी केली जाते. या दिवसाला ‘कालाष्टमी’ देखील म्हणतात. शास्त्रात नमूद केलेल्या कथांनुसार शिवरूपी भगवान ‘काल भैरव’ यांचा जन्म याच तिथीला झाला होता (Kaal Bhairav Jayanti 2020 Puja Muhurat).

काल भैरव जयंतीच्या दिवशी भगवान काल भैरव यांची प्रार्थना करण्याचे काही विशेष विधी आहेत. या खास दिवशी काल भैरवाची पूजा केली गेली, तर ते भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण करतात, असे म्हटले जाते.

पूजेचा मुहूर्त

अष्टमी तिथी 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:49 वाजता सुरू होणार असून, 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 5:19 मिनिटांपर्यंत असेल.

असे मानले जाते की, काल भैरव जयंतीच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्यास ‘काल भैरवा’ची कृपा राखली जाते. भगवान काल भैरव महादेव शंकरांचा एक भाग म्हणून जन्माला आले हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. ‘काल भैरव’ जयंतीच्या या शुभ दिवशी बेलाच्या 21 पानांवर चंदनाने ‘ओम नम: शिवाय’ लिहून शिवलिंगाला अर्पण करून, विधिवत पूजन केल्यास काल भैरव खूप प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील (Kaal Bhairav Jayanti 2020 Puja Muhurat).

अशी करा पूजा…

या दिवशी त्यांची विशेष कृपा प्राप्त करण्यासाठी, काल भैरवच्या मुर्तीसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ‘श्री काल भैरवष्टकम्’चे पठण करा. याचे अखंड पठण केल्याने तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील, असे म्हटले जाते.

भगवान काल भैरव यांच्या जयंतीपासून सलग 40 दिवस, भगवान काल भैरव यांचे पूर्ण भक्तिभावाने अखंडपणे दर्शन घेणाऱ्यावर ते विशेष प्रसन्न होतात आणि त्या भक्ताच्या सर्व इच्छा स्वतःहून पूर्ण करतात. भगवान काल भैरवसाठी केल्या जाणाऱ्या या या विधीवत पूजेला चालीसा म्हणतात. जी चंद्रमासाची 28 दिवसांत आणि 12 राशींची जोड देऊन केली जाते.

भगवान काल भैरव यांना प्रसन्न करण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे जयंतीच्या दिवशी काळ्या कुत्र्यांना गोड भाकरी खाऊ घालणे. परंतु, जर काळा कुत्रा उपलब्ध नसेल तर, आपण कोणत्याही कुत्राला गोड भाकर देऊन हा उपाय करू शकता.

हा उपाय केल्याने केवळ काल भैरवच नाही तर, भगवान शनिदेव यांची कृपादृष्टी देखील तुमच्यावर राहील. या शुभ दिवशी भगवान काल भैरव मंदिरात जाऊन सिंदूर, मोहरीचे तेल, नारळ, हरभरा, चिरौंजी, जिलेबी आणि मद्य अर्पण करा आणि भक्तीभावाने ‘काल भैरवा’ची पूजा करा.

(Kaal Bhairav Jayanti 2020 Puja Muhurat)