आरोग्यासाठी पूरक असणाऱ्या अशा बऱ्याच गोष्टी आपल्या स्वयंपाक घरातच मिळतात. त्यातील एक म्हणजे लसूण. लसणाच्या सेवनाने आपल्या शरिराला अनेक फायदे मिळतात. पण तुम्हाला माहित आहे का आपल्या इथे मिळणाऱ्या लसूणपेक्षा काश्मिरमधला लसूण हा अतिशय वेगळा असतो.काश्मिरमध्येच लसणाचे उत्पादन जास्त घेतलं जातं.
अनेकांना या लसणाबद्दल माहिती नाही. मात्र, हा लसूण उत्तम औषधी गुणधर्म असलेल्यांपैकी एक आहे. काश्मिरी लसूणला पोथी लसूण देखील म्हणतात. यामध्ये अॅलिन आणि अॅलिनेज नावाची दोन संयुगे असतात. ते एकत्र केल्यानंतर अलिसिन नावाचे कंपाऊंड तयार होते. त्यामुळे त्याची चव तिखट असते. तुलनात्मकरित्या हिमालयीन लसूण साध्या लसणापेक्षा सातपट शक्तीशाली असतो.
काश्मिरमध्ये मिळणारा लसूण अतिशय वेगळा
काश्मिरमध्ये मिळणारा लसूण दिसायला हा अतिशय वेगळा असतो. तो एखाद्या काबुली चण्यासारखा किंवा प्लास्टिकच्य गोळ्याप्रमाणे दिसतो. त्याला एकपाकळी लसूणही म्हणतात. आश्चर्याची बाब म्हणजे सर्वसामान्य लसूणपेक्षाही यामध्ये 7 पट पोषकतत्त्वं असल्याचे म्हटलं जाते.
सामान्य लसणाच्या तुलनेत काश्मिरी लसणामध्ये एलिसिनचं प्रमाण अधिक असल्यामुळं तो अनेक आजारांना शरीरापासून दूर ठेवण्यास मदत करतो. हा लसूण खायचा झाल्यास त्याच्या पाकळीची साल काढून तो व्यवस्थित चावून खाल्ल्यानंतर लगेचच कोमट पाणी प्यावं लागतं असं म्हणतात. हा लसूण उपाशीपोटी खाल्ल्यास तो अधिक प्रभावीरित्या काम करतो असं तेथिल लोकांचं म्हणणं आहे.
काश्मिरी लसूणचे फायदे?
हृदयाच्या आरोग्यासाठी हा काश्मिरी लसूण अधिक फायद्याचा असून, त्यामुळं रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. काश्मिरी लसणाच्या पाकळीमुळं रक्तवाहिन्यांमध्ये असणारी सूज कमी होते. अँटी इंफ्लेमेटरी घटकांनी परिपूर्ण असा काश्मिरी लसूण हाडांना बळकटी देण्यास मदत तरतो, शिवाय सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासही मदत करतो.
तसेच यकृताच्या आरोग्यासाठीसुद्धा काश्मिरी लसूण प्रचंड फायद्याचा असून, फॅटी लिवर, लिवर सायरोसिस यांसारख्या समस्या त्यामुळं दूर होतात. यकृताची कार्यक्षमताही या लसणाच्या सेवनामुळं वाढते. काश्मिरी लसूण अँटीऑक्सिडेंट्स आणि फ्लेवोनोईड्सनं परिपूर्ण असल्यामुळं शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती आणखी प्रभावीरित्या काम करु लागते. याशिवाय या लसणाच्या सेवनानं पचनक्रियाही सुधारते. गॅस, अपचन, पोट जड वाटणं अशा समस्या सतावत नाहीत.
शरीराला उर्जा देण्याचं काम करताना हा लसूण रक्त पातळ करत रक्तवाहिन्यांमध्ये सुरु असणारी रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत ठेवण्याचं काम करतो. काश्मिरी लसूण खाल्ल्यानं शरीरात नायट्रीक ऑक्साईडचा स्तर वाढून ते शरीरात सर्वत्र पसरतं. रक्ताभिसरण क्रियेत हा घटक महत्त्वाची भूमिका बजावतो.
कर्करोगाशी लढण्यास मदत करातो
लसणामध्ये नैसर्गिकरित्या ऑर्गनोसल्फर कंपाऊंड असते, ज्याला डायलील ट्रायसल्फाइड म्हणतात. हे शरीरात उपस्थित असलेल्या कर्करोगाच्या पेशी मारण्यात मदत करून कर्करोगाशी लढण्याची क्षमता प्रदान करते. नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाच्या संशोधकांना असे आढळले आहे की जे रुग्ण हिमालय किंवा काश्मिरी लसणाचे सेवन करतात त्यांना कर्करोग होण्याची शक्यता 66.67 टक्के कमी असते.
मधुमेहावर देखील रामबाण उपाय
मधुमेहींसाठी अनेक घरगुती उपाय आहेत. अंमलात आणल्यास हा आजार आटोक्यात येऊ शकतो. परंतु, हिमालयीन लसणामुळे मधुमेहाच्या पाकळ्यांनी मधुमेह आटोक्यात येतो हे अनेकांना माहिती नाही. तुम्हाला मधुमेह असेल तर लसणाच्या 2 ते 3 पाकळ्या खा त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
(डिस्क्लेमर – वरील बातमी संशोधकांनी केलेल्या संशोधनावर आधारित आहे. उपाय करताना किंवा सेवन करताना एकदा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. )