अँटी डँड्रफ शांपूचा वापर करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

| Updated on: Feb 22, 2023 | 1:30 PM

अँटी डँड्रफ शांपू वापरल्यानंतर तुमचे केस देखील कोरडे होतात का आणि केस गळण्याची समस्या वाढते का ? त्यासंबंधित काही गोष्टी जाणून घ्या.

अँटी डँड्रफ शांपूचा वापर करताना या गोष्टी लक्षात ठेवा
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली : तुमच्यापैकी किती जण अँटी डँड्रफ शांपूचा (anti dandruff shampoo) वापर करतात ? अनेकवेळा आपण तुम्ही अँटी डँड्रफ शांपू वापरतो, त्यामुळे कोंडा तर नाहीसा होतो पण इतर तक्रारीही सुरू होतात. खरंतर अँटी-डँड्रफ शांपूमध्ये वापरल्या जाणार्‍या रसायनांमुळे टाळूवरील कोंडा (dandruff on scalp) तर दूर होतोच पण ते आपली त्वचाही खराब करतात. स्काल्प कोरडी (dry scalp) होते आणि त्यामुळे आपले केसही कोरडे होतात. याच कारणामुळे अनेकांना केस गळण्याची समस्याही सहन करावी लागते.

जर तुम्ही तुमच्या केसांवर अँटी-डँड्रफ शांपू वापरत असाल तर तुमचे केस जास्त कोरडे होतात आणि त्याच वेळी ते कमकुवत होऊ लागतात. तर काही लोकांच्या स्काल्पवर या शांपूचा काही उपयोग होत नाही, अशी तक्रारही ते करतात. हा त्रास कमी करण्यासाठी काही गोष्टी जाणून घेऊया.

1) प्रथम सामान्य शांपू वापरा

हे सुद्धा वाचा

बहुतेक लोक केस धुण्यासाठी फक्त अँटी डँड्रफ शांपू वापरतात. तुमचा शांपू टाळूच्या स्वच्छतेसाठी असतो, पण तुम्ही अँटी डँड्रफ शांपू थेट लावला तर त्यामुळे स्काल्पवरील घाण व तेल साफ होते. अँटी डँड्रफ शांपू वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आधी तुमचे केस सामान्य शांपूने धुवा आणि नंतर फक्त स्काल्पवर अँटी डँड्रफ शांपू लावा. अशाप्रकारे तुमचा स्काल्प स्वच्छ करणे सोपे होईल.

2) शांपू 5 मिनिटे स्काल्पवर राहू द्या

जर तुम्ही अँटी डँड्रफ शांपू वापरत असाल तर त्याचा प्रभाव पडण्यासाठी थोडा वेळ द्या. तो स्काल्पवर लावल्याने आणि केस लगेच धुतल्याने तुमच्या शांपूचा केसांवर काहीच परिणाम होत नाही आणि कोंडाही दूर होत नाही. खरंतर शांपूचा परिणाम व्हावा यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. या रसायनांमुळे तुमची स्कॅल्प व्यवस्थित स्वच्छ व्हावी यासाठी, स्काल्पवर शांपू कमीत कमी 5 मिनिटे ठेवा. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे ते केसांच्या लांबीवर अवलंबून नसते तर ते स्काल्पवर अवलंबून असते. केसांवर थेट अँटी डँड्रफ शांपू लावल्यास केस अधिक कोरडे होतात.

3) हायड्रेटिंग कंडीशनरचा आवर्जून करा वापर

केसांवर थेट अँटी डँड्रफ शांपू वापरला नाही तरीही केसांमध्ये कोरडेपणा राहतो. त्यामुळे केसांसाठी चांगले आणि हायड्रेटिंग कंडिशनर वापरणे महत्त्वाचे आहे. तुमचे केस आधीच कोरडे असल्यास क्रीम बेस्ड कंडिशनर वापरा आणि तेलकट असल्यास वॉटर बेस्ड कंडिशनर लावा. त्याने केसांना फायदा होतो व ते कोरडे होण्यापासून बचाव होता.