Benefits of Potato Leaves | अळूच्या पानांपासून बनवलेल्या भाजी आणि भज्यांना कुठेही तोड नाही, प्रत्येकाला त्याची चव आवडते. पण तुम्हाला माहीत आहे का की, ही अप्रतिम पाने आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर (Beneficial) आहेत. आयुर्वेदानुसार या पानांच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्या दूर केल्या जाऊ शकतात. अळूची भाजी, अळूच्या वड्या अनेकजण चवीने खातात. अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. या पानांचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यापैकी एक ‘अरबी पाने’ अर्थात ‘अळूची पाने’ ही एक अतिशय आरोग्यदायी भाजी (Healthy vegetables) आहे. हृदयाच्या आकाराच्या अळूच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. भारतीय घरांमध्ये भाजी शिवाय इतर विविध पदार्थांमध्ये देखील ही पाने वापरली जातात. जाणून घ्या, अळूच्या पानांमध्ये लपलेले हे गुणधर्म (These properties are hidden) आणि त्यांचे फायदे.
अळूची पाने आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत, यामुळे दृष्टी वाढते. हे त्यामध्ये असलेल्या बीटा-कॅरोटीनमुळे होते, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. त्यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर राहतात.
अळूच्या पानांचे सेवन केल्याने शरीरातील वाढलेले वाईट कोलेस्ट्रॉलही कमी करता येते. संशोधनात असे आढळून आले आहे की अळूच्या वाळलेल्या पानांपासून बनवलेली पावडर लिपिड प्रोफाइल दुरुस्त करू शकते.
अळूचे पान दिसायला अगदी हृदयाच्या आकाराचे असते आणि याच्या सेवनाने तुमचे हृदयही निरोगी राहते. यामध्ये फायबरचे प्रमाण असल्याने हृदयविकाराची शक्यता कमी होते.
अॅनिमिया हा एक आजार आहे जो शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे होतो. त्यामुळे यासाठी तुम्ही अळूच्या पानांचे सेवन करावे कारण त्यात लोहाचे प्रमाण अधिक असते.
अळूच्या पानांच्या सेवनाने रक्तदाबही नियंत्रणात ठेवता येतो.
वर नमूद केल्याप्रमाणे, त्यात फायबरचे प्रमाण असते, त्यामुळे ते तुमची पचनसंस्था देखील निरोगी ठेवते. जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केल्याने शरीरात चरबी जमा होते. अळूच्या पानांमध्ये फारच कमी कॅलरी आढळतात. यात आहारातील फायबर देखील असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. विविध गुणांनी समृद्ध असल्याने, अळूची पाने शरीराच्या अनेक विकारांवर विजय मिळविण्यास मदत करतात. हे केवळ रक्तातील साखर नियंत्रित करतेच, परंतु डोळ्यांची दृष्टी देखील वाढवते.
रक्ताच्या कमतरतेमुळे वाढणारा अॅमनिमियाचा त्रास रोखण्यास अळू मदत करते. अळूमध्ये नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन सी उपलब्ध असल्याने आयर्न शोषून घेण्याची क्षमतादेखील सुधारते.
बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए असल्यामुळे अळूची पाने त्वचा आणि केसांसाठीही खूप फायदेशीर आहेत.