Guava in winter : तुम्हाला पेरू खायला आवडतात का? असं असेल तर ही योग्य वेळ आहे. कारण, हिवाळ्यात पेरू खाणे अनेकांना आवडते. त्याची चव मनाला प्रसन्न करते. तसेच पेरू खाण्याचे स्वतःचे काही खास फायदे आहेत. परंतु, चुकीच्या वेळी पेरू खाल्ल्याने तुम्ही आजारीही पडू शकता. तुम्हाला बराच काळ सर्दी-खोकल्याचा त्रासही देऊ शकता. तुम्हाला पेरू खाण्याची योग्य वेळ माहित असायला हवी. या वेळी काही पाककृती बनवल्या तर पेरू खाण्याचं सुखच वेगळं. यामुळे तुम्हाला सर्दी-खोकला देखील होणार नाही. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हिवाळ्यात पेरु खाण्याची उत्तम वेळ
हिवाळ्यात पेरू खाण्याची उत्तम वेळ उन्हाच्या वेळी किंवा सकाळी 8 ते दुपारी 3 अशी असते. यानंतर पेरू खाणे टाळा कारण संध्याकाळीर थंडी वाढते आणि मग आजारी पडण्याचा धोका वाढतो. तसेच जर तुम्ही या 3 प्रकारे पेरू खाल्ले तर तुम्ही अनेक समस्या टाळू शकता.
खोकला सर्दी टाळण्यासाठी 3 पेरु पाककृती
पेरू चाट रेसिपी
पेरू चाट खाणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. त्यासाठी फक्त पेरू चिरून त्यात काळे मीठ, चाट मसाला आणि काळी मिरी पावडर लावावी लागते. यात तुम्ही इतरही अनेक फळे मिसळू शकता. त्याची चवही चांगली लागते.
पेरूची चटणी रेसिपी
पेरूची चटणी खायला कोणाला आवडत नाही? फक्त पेरू शिजवून त्यात मीठ, पुदिना, गूळ आणि लाल मिरची घालून बारीक करून घ्यायचं आहे. आता त्यात मोहरीचे तेल घाला आणि नंतर सर्व्ह करा. हे खाल्ले तरी तुम्हाला खोकला आणि सर्दीचा त्रास होणार नाही.
पेरूचे लोणचे रेसिपी
पेरूचे लोणचे खाल्ले नसेल तर एकदा ट्राय करावे. यासाठी पेरू कापून त्यात हळद पावडर घालावी लागते. नंतर एका कढईत थोडे मोहरीचे तेल घालून त्यात थोडी चणाडाळ, लसूण आणि मीठ घालावे. यानंतर पेरूमध्ये हे टेम्परिंग घालावे. नंतर त्यात लिंबाचा रस आणि कोथिंबीर, मेथी, बडीशेप आणि जिरे पूड घाला. हे सर्व मिसळल्यानंतर उन्हात ठेवून चांगले शिजवून खावे.
व्हिटॅमिन C ची अॅलर्जी
काही लोकांना हिवाळ्यात पेरू खाण्याची भीती वाटते. यामागचे कारण म्हणजे काही व्हिटॅमिन C ची अॅलर्जी आणि सर्दीची भीती असते. पण, पेरू योग्य वेळी खाल्ले तर या सर्व समस्या टाळता येतील. वरील रेसिपींचा आधार घेऊन तुम्ही पेरूंचा आस्वाद घेऊ शकतात.
(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)