पॉपकॉर्न म्हंटल की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खायला आवडतं, तुम्ही किंवा तुमच्या मुलांसोबत सिनेमागृहात चित्रपट बघायला बसताना पॉपकॉर्न घेतल्याशिवाय बसत नाही. चित्रपटगृहांपासून मॉल्सपर्यंत मुले पॉपकॉर्न खाण्याचा आग्रह धरू लागतात. मात्र, मुलांच्या आरोग्याचा विचार करून त्यांना सतत बाहेर खाऊ घालणे देखील योग्य नसते. यासाठी तुम्ही जेव्हा घरीच मुलांना मॉलप्रमाणे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पॉपकॉर्न तयार करून खायला देऊ शकता. हे पॉपकॉर्न बनवणंही अवघड नाही.
आजकाल बाजारात असे अनेक खाद्यपदार्थ सहज मिळतात जे एक ते दोन मिनिटात बनवले जातात आणि त्यापैकीच एक म्हणजे पॉपकॉर्न, पण ते आरोग्यासाठी चांगले नसतात. कारण या पॅकेज्ड पॉपकॉर्नमध्ये आर्टिफिशियल फ्लेवर तसेच प्रिझर्व्हेटिव्ह मिसळ जातात. ज्यामुळे असे पॉपकॉर्न खाण्याने फायद्याऐवजी शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. यासाठी तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने पॉपकॉर्न घरी बनवू शकता. कसे ते चला जाणून घेऊयात.
आपल्यापैकी अनेकजण घरच्या घरी मक्याच्या दाण्यांपासून पॉपकॉर्न तयार करतात. पण घरी केलेले पॉपकॉर्न नीट फुलत नाही अशी तक्रार असल्याने अनेक महिला घरी पॉपकॉर्न करणे टाळतात. तर तुम्हाला पॉपकॉर्न करण्यासाठी आधी मक्याचे दाने पांढरे असल्यास घेणे टाळा. यासाठी सर्वप्रथम मक्याचे कणीस पासून दाणे मुळापासून वेगळे करून खालून थोडे फुगलेले गोल आहेत हे पहावे. अशापद्धतीने दाणे काढून झाल्यावर हे दाणे चांगले कडक वाळवून हवाबंद डब्यामध्ये ठेवा. त्यात तुम्ही जेव्हा कुकरमध्ये पॉपकॉर्न तयार करता तेव्हा हे लक्षात ठेवा कि सर्वात आधी कुकर पूणपणे गरम करून घ्याचा त्यानंतरच त्यात मक्याचे दाणे त्यात टाका.
अनेकवेळा तुम्ही घरी पॉपकॉर्न बनवताना साधे पॉपकॉर्न तयार करतो. पण तुम्ही या पद्धतीने आता घरच्या घरी चवदार पॉपकॉर्न देखील बनवू शकता. लहान मुलांना कॅरेमलाइज्ड पॉपकॉर्न खायला खूप आवडतात. यासाठी सर्वप्रथम कुकरमध्ये थोडे लोणी गरम करून त्यात पॉपकॉर्न टाकावे. दुसऱ्या कढईत थोडा गूळ आणि पाणी घालून त्याचा पाक तयार करा आणि वेलची पूडही घाला. तयार पॉपकॉर्न या पाकात घालून हलकेच मिक्स करा. त्यानंतर यावर चॉकलेट किसून हाताने हलके मिक्स करा. चॉकलेट फ्लेवर असलेले कॅरमेलाइज्ड पॉपकॉर्न खाण्यास तयार आहे.
मसाला पॉपकॉर्न बनवायचा असेल तर एक सोपी पद्धत आहे. कढईत सुमारे तीन चमचे लोणी घालून त्यात एक कप वाळलेले मक्याचे दाणे घाला आणि मग मका फुलायला लागल्यावर त्यात एक ते दोन चिमचे हळद घाला, त्यासोबत चाट मसाला घाला. सर्व मका फुला की तो बाहेर काढावा. अशा प्रकारे तुमचा चवदार मसाला पॉपकॉर्न तयार होईल.
जर तुम्हाला लेमन पॉपकॉर्न बनवायचे असेल आणि आंबट चव ही हवी असेल तर बटर, कॉर्न, सैंधव मीठ आणि लिंबाचा रस टाकून पॉपकॉर्न तयार करा. यासाठी सर्वप्रथम थोडे बटर घालून पॉपकॉर्न तयार करा. यानंतर एका पॅनमध्ये बटर घालून ते ब्राऊन होईपर्यंत बटर शिजवा. त्यानंतर गॅस बंद करा आणि त्यात लिंबाचा रस घाला. आता हे त्यात झालेलं मिश्रण तयार झालेल्या पॉपकॉर्न मध्ये घालून त्यात सैंधव मीठ घालून चांगले मिक्स करा. लेमन ब्राऊन बटर पॉपकॉर्न खाण्यास तयार आहे.