Uric Acid : युरिक अॅसिडची समस्या त्रास देतेय? मग चुकूनही हे पदार्थ खाऊ नका! अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील
तुमच्या शरीरामध्ये युरिक अॅसिडची समस्या वारंवार त्रास देत असेल तर यामुळे संधिवात आणि गाउट यासारखे आजार सुद्धा तुम्हाला होतील. यामुळे आपल्या सांध्यांना नेहमी सुज येते अशा परिस्थितीत आपल्याला काही पथ्ये पाळणे सुद्धा गरजेचे आहे. चला तर मग जाणून घेऊया काही अशा पदार्थांबद्दल जे आपल्याला चुकून सुद्धा खायचे नाहीत.
1 / 5
पान कोबी, कोबी, मशरूम, चिकन, सीफूड इत्यादी पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात प्यूरीन (pyurin) उपलब्ध असते. जर तुम्हाला वारंवार युरिक अॅसिडची समस्या त्रास देत असेल तर अशावेळी आपल्याला या पदार्थांचा समावेश आहरांमध्ये करायचा नाही यामुळे तुमची युरिक अॅसिडची (uric acid) समस्या अधिक वाढू लागेल.
2 / 5
मनुके हे सर्व सामान्यपणे आपल्या आहारासाठी अत्यंत फायद्याचे मानले जातात, परंतु जर तुमच्या शरीरामध्ये युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले तर अशावेळी मनुके अजिबात खाऊ नका, कारण 100 ग्रॅम मनुक्यांमध्ये अंदाजे 105 मिलिग्रॅम प्यूरीन असते.
3 / 5
पालक आणि हिरवे वाटाणे या दोन्ही पदार्थांमध्ये जास्त प्रमाणात प्यूरीन आढळून येते. तसे पाहायला गेले तर यामध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्वही उपलब्ध असतात परंतु जेव्हा तुमच्या शरीरामध्ये युरिक अॅसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर अशा वेळी या दोन्ही पदार्थांचे सेवन अजिबात करू नका.
4 / 5
हिवाळ्यात अनेक लोक भुईमुगाच्या शेंगा खाणे पसंत करतात, कारण की यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. शेंगदाणे हे आपल्या शरीरासाठी पोषक तत्वांनी युक्त असे भांडार मानले जाते परंतु 100 ग्रॅम शेंगदाण्यांमध्ये 75 एमजी प्यूरीन असते अशात संधिवात आणि गाउटच्या रुग्णांच्या शरीरात युरिक अॅसिड वाढते. त्यामुळे अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये शेंगदाण्याचा समावेश अजिबात करू नये.
5 / 5
मद्यपानाचे समर्थन करणे अत्यंत चुकीचे आहे आणि मध्यपान केल्याने आपल्या शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. जर तुमच्या शरीरामध्ये युरिक अॅसिडचे प्रमाण वाढले असेल तर अशावेळी मद्यपान करणे तुमच्यासाठी विष ठरू शकेल, कारण दारूमध्ये प्यूरीनची मात्रा जास्त असते म्हणूनच जर तुम्हाला यूरिक अॅसिडचा त्रास जास्त सतावत असेल तर अशा वेळी मद्यपान अजिबात करू नका यामुळे युरिक अॅसिड शरीरामध्ये वाढू लागेल आणि हे तुमच्यासाठी घातक ठरेल.