आयुर्वेदात लसणाला महाऔषधी म्हटलं गेलं आहे. जुन्याकाळात लसणाचा औषधी वापर केला जात होता. त्यात पोषक तत्त्व आहेत आणि अँटीऑक्सिडंट्स शरीराला निरोगी ठेवण्यात मोठी भूमिका बजावतात. सकाळी ब्रश केल्यानंतर रिकाम्यापोटी एक लसणाची पाकळी खाल्ल्याने शरीराला अत्यंत चांगले लाभ मिळतात. सकाळी रिकाम्यापोटी कच्च्या लसणाची एक पाकळी खाणं आरोग्यसाठीचा प्रभावी उपाय मानला जातो. त्याचं नियमित सेवन केल्यास अत्यंत चमत्कारीक लाभ मिळतात. परंतु, त्याची मात्र योग्य हवी. लसणाची एक पाकळी सकाळी रिकाम्यापोटी खाल्ल्याने काय फायदे होतात यावरच आज चर्चा करणार आहोत.
इम्युनिटी वाढवतो
लसणात एलिसिन नावाचं कंपाऊंड असतं. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (इम्यून सिस्टीम) वाढते. त्यामुळे पडसं, खोकला आदी संसर्गजन्य आजार होत नाही.
हृदयाच्या आरोग्यासाठी लाभकारी
रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रित होते. लसूण खराब कोलेस्ट्रॉलला कमी करतो. चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतो. तसेच ब्लड प्रेशरलाही कंट्रोल करून हृदयाचं आरोग्य कंट्रोल करतो.
वजन कमी करण्यास मदत
लसूण मेटाबॉलिज्मला सक्रिय करतो. त्यामुळे शरीरातील फॅट वेगाने बर्न होतात. नियमितपणे सकाळी कच्चा लसूण खालल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते.
डिटॉक्सिफिकेशनसाठी लाभकारी
लसूण शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतो. त्यातील सल्फर कंपाऊंड लिव्हरला डिटॉक्सिफाई करतो. त्यामुळे शरीर निरोगी आणि एनर्जीने भरलेलं असतं.
पचन तंत्रात सुधारणा
लसूण रिकाम्या पोटी खाल्ल्याने पचन तंत्राला चांगलं बनवतो. त्यामुळे पोटातील गॅस, अपचन, कब्ज आदी समस्या दूर होतात.
त्वचा आणि केसांना फायदा
लसणात अँटिऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुण असतात. ते त्वचेला स्वच्छ आणि चमकदार बनवतात. त्यामुळे केस गळती रोखली जाते. केस मजबूत होतात.
मधुमेहासाठी वरदान
लसणामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते. लसूण रोज खाल्ल्याने डायबिटिजच्या रुग्णांना बराच फायदा होतो.
कसा खायचा?
सकाळी ब्रश केल्यावर कच्चा लसण्याची एक पाकळी सोलून खा
लसणाची पाकळी थेट गिळू शकता किंवा चावून खाऊ शकता
कच्च्या लसणाची पाकळी खाणं कठीण होत असेल तर कोमट पाण्यासोबत खाऊ शकता
खबरदारी काय?
ज्या लोकांना लसणाची अॅलर्जी आहे, त्यांनी लसूण खाऊ नये
अधिक प्रमाणात लसूण खाल्ल्याने पोटात आग पडू शकते, अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो
गर्भवती महिला किंवा औषधे घेणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लसूण खाल्ला पाहिजे
(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)